दिनेश महाडीक यांना रायगड जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर
संतोष सुतार-माणगांव
सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ संभे संचलित रायगड माध्यमिक विद्यामंदिर कांदळगाव या विद्यालयाचे मुख्याध्यापक दिनेश महाडीक यांना रायगड जिल्हा परिषदेचा सन 2020 -21 यावर्षी चा माध्यमिक विभागातून आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे.
पुरस्कारप्राप्त शिक्षक दिनेश महाडीक माणगाव तालुक्यातील बामणगावचे सुपुत्र असून रायगड माध्यमिक विद्यामंदिर कांदळगाव येथे सलग 21 वर्षे अध्यापन करत आहेत . शिक्षकी पेशा सांभाळत असताना , तालुक्यातील विविध सामाजिक कार्यातही त्यांचा सक्रिय सहभाग असतो. श्री सांप्रदायाच्या माध्यमातून दासबोधाचे निरूपण करून अध्यात्माचा वारसा जपत असून , सप्टेंबर महिन्यात कोल्हापूर येथील अविष्कार सोशल अॅन्ड एज्युकेशनल फाऊंडेशनच्या वतीने त्यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
रायगड जिल्हा परिषदेतर्फे यावर्षी चा आदर्श शिक्षक पुरस्कार दिनेश महाडीक यांना जाहीर झाल्यानंतर संस्थेचे अध्यक्ष संजीव जोशी , सचिव सुनील जगताप, आणि बोरवाडी परिसरातील विविध मान्यवरांकडून कौतुक होत आहे.