परतीच्या पावसाने शेतकऱ्यांची दाणादाण,दुबार पेरणीचे संकट
मिलिंदा पवार -खटाव,सातारा
संततधार पावसाने परिसरातील सर्व ओढे नदी नाले भरून वाहू लागले आहेत येरळा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे कोवळी पिके पाण्यात बुडाल्याने केलेली पेरणी वाया जाण्याची चिंता शेतकरी व्यक्त करीत आहेत दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर आले आहे सोयाबीन मका पिकांचे मोठे नुकसान झाले आहे तर अनेक भागात तोडणीस आलेला ऊसही भुईसपाट झाला त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसानीचा सामना करावा लागत आहे त्या
तच पावसामुळे खटाव तालुक्यातील मायणी गावाचा संपर्क तुटला आहे तेथील दोन्ही पुलावरून पाणी वाहत आहे तर एक पूल वाहून गेला आहे परिणामी जनजीवन विस्कळीत झाले आहे तालुक्यातील वरकुटे मलवडी येथील पुलावर ही पाणी आले होते त्यामुळे काही काळ वाहतूक बंद पडलेली जिल्ह्यात सर्वत्र पाऊस झाल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे तसेच वडूज मधील येरळा नदी दुथडी भरून वाहत आहेत व पुलापर्यंत पाणी आले आहे तसेच शेजारी असणाऱ्या इमारतींमध्येही नदीचे पाणी घुसले होते पण गुरुवारच्या पावसाच्या विश्रांतीमुळे पाणी उतरले असले तरी कालपर्यंत ज्या आपल्याच नादात डुलत असलेले पीक जमीनदोस्त झाले तर अगदी हातातोंडाशी आलेला घास परतीच्या पावसाने हिसकावून घेतला शेतकरी राजाच्या पदरी या परतीच्या पावसाने निराशा आली आहे तेव्हा सरकारने या सर्व गोष्टींची दखल घेऊन ओला दुष्काळ जाहीर करून शेतकरी राजाला मदतीचा हात द्यावा हीच अपेक्षा