पावसाच्या तडाख्यात ऊसाने घेतली आडवी झेप; सोयाबीन , तूर सह अन्य पिके पाण्यात
जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा शेतकऱ्यांची मागणी
राम जळकोटे-तुळजापूर
तुळजापूर तालुक्यातील किलज आणि परिसरातील शेतीची परिस्थिती ही शेतातच ओढा निर्माण केली आहे.गेल्या ४ दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे किलज, होरटी परिसरातील शेतीतील पिके ही चक्क आडवी झाली आहेत. सोयाबीन , तूर सह अन्य पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.आता आम्हाला पंचनामे नको तर उपाययोजना हव्या आहेत, अशी विनंती आता शेतकरी करीत आहेत.एक तर आधी कोरोना आणि त्यात हा ओला दुष्काळ निर्माण झाल्याने शेतकरी कमालीचा अडचणीत सापडला आहे.
केलेली लागवड आणि कष्ट ही वाया जात असल्याने आता जगावं की मरावं हा प्रश्न या शेतकरी वर्गानी निर्माण केला आहे. पावसाच्या या झडाख्याने सर्वकाही वाहून गेल्याने आता शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे.
आता आम्हाला पंचनामे नको तर उपाययोजना हव्या आहेत अशी मागणी आता शेतकरी करत आहेत.