मगरींच्या वावरास कारणीभूत असणाऱ्यांवर कारवाई करा अन्यथा कायदा हातात घेऊ ,युवासेना आक्रमक
ओंकार रेळेकर-चिपळूण
शहरातील भोगाळे येथे थेट पहिल्या मजल्यावर मगर आढळून आली. मगरी शहरानजीक नदीत फार पूर्वीपासूनच आहेत. परंतु हल्ली हल्ली शहरात घुसण्याचे प्रमाण वाढत आहे. याला जबाबदार काही मांसविक्री करणारे तसेच खाण्याचे पदार्थ शिवनदीमध्ये टाकणारे हेच आहेत , असे वारंवार निवेदन देऊन सुद्धा त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही.यामुळे प्रदूषणा बरोबरच नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.
तरी हे जे कोणी करत असतील त्यांना प्रशासनाने योग्य ती समज द्यावी आणि संबंधितांनी देखील याबाबत नियमांचे पालन करावे अन्यथा आम्ही शिवसेना स्टाईलने त्यांना समजवू वेळप्रसंगी कायदा हातात घ्यावा लागला तरी चालेल असा इशारा युवासेना शहर संघटक निहार कोवळे यांनी दिला आहे.