Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

ऊसतोड कामगार व वाहतूकदार यांची शरद पवार यांच्या सोबत बैठक

ऊसतोड कामगार व वाहतूकदार यांची शरद पवार यांच्या  सोबत बैठक

मिलिंद लोहार -पुणे


राज्यातील ऊसतोड कामगार आणि ऊस वाहतूक संघटनांच्या विविध मागण्यांसंदर्भात आज वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे  शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली  बैठक पार पडली.ऊसतोड कामगारांच्या दरवाढीच्या मागणीबाबत या बैठकीत यशस्वी तोडगा निघाला असून कामगारांना १४ टक्क्यांची दरवाढ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय यावेळी घेण्यात आला.
या बैठकीला राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री मा.नामदार बाळासाहेब पाटील , महसूलमंत्री मा.नामदार बाळासाहेब थोरात , सामाजिक न्याय मंत्री मा.नामदार धनंजय मुंडे , साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर  भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे , माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील , साखर संघाचे उपाध्यक्ष आबासाहेब पाटील यांच्यासह ऊसतोड कामगार संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

ऊसतोड कामगारांच्या दरवाढीच्या मागणीबाबत या बैठकीत यशस्वी तोडगा निघाला असून कामगारांना १४ टक्क्यांची दरवाढ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय यावेळी घेण्यात आला.साखर कारखान्यांशी दरवाढीसंदर्भातील तीन वर्षांचा करार करण्यात येईल. तसेच मुकादमांचे कमिशन १९ टक्के करण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. ऊसतोड कामगार संघटनांनी याबाबत समाधान व्यक्त केले असून कामगार आता कारखान्यांवर रूजू होतील.

या बैठकीदरम्यान स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाद्वारे ऊसतोड कामगारांच्या उपाययोजनांबाबत सादरीकरण करण्यात आले. महामंडळ नोंदणी लवकर पूर्ण करून डिसेंबरपासून महामंडळाचे कामकाज पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना बैठकीत निर्देश देण्यात आले. ऊसतोड कामगारांची नोंदणी, साखर कारखाने तसेच ऊसतोड कामगारांसाठी नवीन योजना, वैयक्तिक अर्थसहाय्य योजना, ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी वसतीगृहे, भोजन योजना, कामगार महिलांसाठी आरोग्य योजना, कामगारांसाठी विमा योजना, यांसह विविध बाबींवर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies