पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचा चटका सहन करणाऱ्या नागरिकांना आता सीएनजी आणि घरगुती गॅसच्या (पीएनजी) दरात घट झाल्याने काहीसा मिळणार दिलासा
सुरेश अंबुरे -पुणे
पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचा चटका सहन करणाऱ्या नागरिकांना आता सीएनजी आणि घरगुती गॅसच्या (पीएनजी) दरात घट झाल्याने काहीसा दिलासा मिळणार आहे. शुक्रवारी मध्यरात्रीपासून सीएनजी दर प्रतिकिलो ८५ पैसे आणि घरगुती वापराच्या पीएनजी गॅसचा दर ५० पैशांनी कमी होणार आहे.
महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडकडून (एमएनजीएल) शहरातील 'सीएनजी'च्या (कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस) आणि घरगुती वापरासाठीच्या 'पीएनजी'च्या (पाइप नॅचरल गॅस) दरात कपात करण्यात आली आहेत. सध्या 'सीएनजी' गॅस ५४.८० रुपये आणि घरगुती गॅसची २७.७० रुपये प्रतिकिलो दराने आहे. सीएनजीचा नवीन दर ५३.९५ रुपये आणि पीएनजीचा नवीन दर २७ रुपये २० पैसे होणार आहे. शहरातील सीएनजी आणि पीएनजी गॅसचे नवे दर शुक्रवारी मध्यरात्रीपासून लागू होणार आहेत, अशी माहिती 'एमएनजीएल'चे वाणिज्य संचालक संतोष सोनटक्के यांनी दिली.