मल्हार पेठला नवीन पोलिस ठाणे मंजूर
हेमंत पाटील-पाटण
पाटण तालुक्यातील मल्हारपेठ. पोलिस ऑटपोस्त चे उपग्रेशन नवीन पोलिस स्टेशनच्या मागणीला यश आले आहे..मल्हारपेठ पोलिस ठाण्याला गृह विभागाने मंजुरी दिल्याचा शाशन निर्णय पारित केल्याची माहिती गृह राज्य मंत्री शंभू राजे देसाई यांनी दिली.
गृहराज्मंत्री म्हणाले मंत्रालयात महिनाभर पूर्वी गृह विभागातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी चर्चा केली. यात महिन्याच्या आत मल्हारपेठ तालुका पाटण येथील पोलिस औट पोस्टचे अपग्रेशन करून याठिकाणी नवीन पोलिस स्टेशन करण्याची सर्व प्रक्रिया पूर्ण करून हा प्रस्ताव मान्यतेसाठी शासनाकडे सादर करण्याच्या सूचना वरिष्ठ अधिकारी यांना केल्या होत्या.यानंतर सातारा पोलिस अधीक्षक यांच्या आस्थापनेवरील पाटण आणि उंब्रज पोलिस ठाण्याचे विभाजन करून मल्हारपेठ दुर्क्षेत्र आणि चाफळ दुर्क्षेत्रचे अपग्रेदेशन करून नवीन मल्हारपेठ पोलिस ठाणे निर्माण करण्यास तसेच मनुष्य बळ उपलब्ध करून देण्यास गृह विभागाने मान्यता दिली आहे......