चंद्रघटा दुर्गा माता
मिलिंदा पवार-खटाव
शारदीय नवरात्रीच्या तिसर्या दिवशी चंद्रघंटा मातेचे नवदुर्गाचे तिसरे स्वरूप म्हणून चंद्रघंटा मातेचे पूजन केले जाते चंद्रघंटा देवीचे रूप अत्यंत शांत आणि कल्याणकारी आहे वाघावर स्वार असलेल्या आई चंद्रघंटा च्या शरीराचा रंग सोन्यासारखा समजदार आहे देवीच्या कपाळावर घंटेच्या आकाराचा अर्धचंद्र आहे म्हणून त्यांना चंद्रघंटा म्हणतात दहा हातांच्या देवीच्या प्रत्येक हातात वेगवेगळी शस्त्रे आहेत तलवार, खडग, ढाल, त्रिशूल, कमंडलू, गदा, चक्र ,धनुष्य, कमळ तसेच देवी वाघावर स्वार आहे व देवीची मुद्रा युद्धाची आहे. गळ्यामध्ये पांढऱ्या रंगाच्या फुलांची माळ आहे या देवीची पूजा केल्याने आपली भीतीपासून मुक्ती होऊन साहसाची वृद्धी होते तसेच पूजा करताना लाल वस्त्र धारण करून तसेच लाल फूल, लाल चुनरी देवीला वाहून देवीचे पूजन केले असता भयाचा नाश होतो असे मानणे आहे.