Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन,एकशे पाच असं पाठबळ असताना सत्ता न मिळाल्याने सत्ता अस्थिर करण्याचे काम करणारे मासा पाण्याबाहेर गेल्यावर तडफडतो तशी अवस्था भाजपची झाली आहे खासदार सुनील तटकरे यांनी माजी मुख्यमंत्री फडणवीस आणि भाजपवर जोरदार टीका

मासा पाण्याबाहेर गेल्यावर तडफडतो तशी अवस्था भाजपची 

खासदार सुनील तटकरे यांनी माजी मुख्यमंत्री फडणवीस आणि भाजपवर जोरदार केली टीका

  अमूलकुमार जैन-मुरुड



 मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन,एकशे पाच असं पाठबळ असताना सत्ता न मिळाल्याने सत्ता अस्थिर करण्याचे काम करणारी माणसं राजकारण करत आहेत.सत्ता न मिळाल्याने मासा जसा पाण्याबाहेर गेल्यावर तडफडतो तशी अवस्था माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची झाली आहे अशी जोरदार टीकास्त्र रायगडचे खासदार सुनिल तटकरे यांनी मुरुड येथे केली मात्र त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता टीका केली  दरम्यान भाजपवरही त्यांनी निशाणा साधला.कोविडच्या भयावय स्थितीचा अभ्यास करून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे संयमाने अनलॉकसाठी प्रयत्न करीत  असले तरी भाजप राजकारण करीत आहे असेेही पुढे खासदार सुुनिल तटकरे म्हणाले. 



राज्यात महाविकासआघाडीतील सत्तेचा उपयोग जनतेची कामे करण्यासाठीच आम्ही करीत आहोत . विकास कामांमध्ये सर्वांना सोबत घेऊन पुढे जायचे आहे . कुठलाही 

राजकीय अभिनिवेश न पहाता  जिल्ह्यातील 

कोविडची महामारी नियंत्रित करण्यासाठी आरोग्य यंत्रणा सक्षम करणे असो वा निसर्गचक्रीवादळग्रस्तांना नुकसानभरपाई मिळवुन देणे कामी कटिबद्ध असल्याचे सांगितले . कार्यकर्त्यांनी देखिल झोकुन देऊन पक्षसंघटन मजबुत करावे आणि पक्षाची प्रतिष्ठा जनमानसात वाढविण्याची मनोभूमिका घ्यावी असे आवाहन रायगडचे  खासदार सुनील तटकरे यांनी मुरुड तालुका राष्ट्रवादी कार्यकर्ता मेळाव्यात केले .

 या मेळाव्यास रायगड जिल्हा अध्यक्ष सुरेश लाड ,रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुधाकर घारे, मुरूड तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष मंगेश दांडेकर, ज्येष्ठ नेते अतिक खतीब,   अल्पसंख्याक अध्यक्ष नाझीम हसवारे, माजी पं.स. सभापती स्मिता खेडेकर ,सभापती अशीका ठाकूर ,माजी जि.प.

सदस्य सुबोध महाडिक, जिल्हा युवक अध्यक्ष अंकित साखरे ,रायगड जिल्हा महिला अध्यक्षा गीता पालरेचा, समाज कल्याण सभापती गीता जाधव आदी उपस्थित होते .

रायगड जिल्हाध्यक्ष सुरेश लाड यांनीही पक्ष संघटना वाढवण्यासाठी बुथ पातळीपर्यंतजुन्या नव्या कार्यकर्त्यांनी झोकून देण्याचे आवाहन करीत अलिबाग येथील जिल्हा कार्यालयात दर सोमवारी जनतेच्या समस्यांचे निराकारण करण्यासाठी आपण उपलब्ध असल्याचे सांगितले .

आपल्या भाषणात तटकरे यांनी भाजप वर शरसंधान साधत कोविड च्या भयावय स्थितीचा अभ्यास करून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे संयमाने अनलॉकसाठी प्रयत्न करीत  असले तरी भाजप राजकारण करीत असल्याचा आरोप केला . मात्र केंद्र शासनाच्या कृषी विधेयक व कामगार विधेयक ठराव पारीत करून शेतकऱ्यांच्या पदरात आधारभूत किंमती पडणार नसल्याने अंबानी , अदानी सारख्या मुठभर  भांडवलदारांचेच हित पाहिले आहे . कंत्राटी कामगारांना रस्त्यावर आणल्याबद्दल तीव्र नापंसती  व्यक्त केली . याच कारणांमुळे  राष्ट्रीय लोकशाहीतील शिवसेना व अकाली दल हे जुने मित्र पक्ष बाहेर पडल्याचे स्पष्ट केले .

मुरुड शहराला पर्यटन ब दर्जा , सागरी महामार्ग तसेच  किनारा सुशोभिकरण, आगरदांडा 

बंदर   व परिसराचा विकास करण्यासाठी पालकमंत्री आदिती तटकरे प्रयत्नशील असुन  उच्चपदाधिकाऱ्यांसमवेत क्षेत्र पाहाणी दौरा केल्याचे सांगितले  . तसेच केंद्र शासनाने प्रस्तावित औषध निर्माण कंपनी साठी 1 हजार कोटी मंजुर केल्यास मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती शक्य असल्याचा मानस व्यक्त केला .

या मेळाव्यास सामाजिक अंतर राखत मास्क लावत तालुक्यातील राष्ट्रवादीचे असंख्य कार्यकर्तें हजर होते .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies