शरद गांगल कुटुंबियांची माणगांव माऊली वृद्धाश्रम व सामाजिक संस्थांना आर्थिक मदत !
संतोष सुतार-माणगांव
-माणगांव येथील माऊली वृद्धाश्रम व अनेक सामाजिक संस्थांना शरद गांगल कुटुंबीयांनी आर्थिक मदत दिली आहे.
विविध सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते शरद गांगल कुटुंबियांनी माणगांव येथील माऊली वृद्धाश्रमास रुपये अकरा हजाराची मदत दिली आहे.माऊली वृद्धाश्रम हे माणगांव तालुक्यातील बोरवाडी याठिकाणी आहे.
संस्कृत शिक्षिका मोहिनी शरद गांगल यांनी जनकल्याण रक्तपेढी महाड रक्त विघटन प्रकल्पास रुपये एक लाख ,शरद गांगल यांनी भारतीय वायुसेना यांस पन्नास हजार,रामजन्मभूमी तिर्थक्षेत्रास एक लाख रुपये,विश्व हिंदू परिषदेस पन्नास हजार अशी बहुमोल मदत केली आहे.
महाड येथील गांगल कुटुंबियांनी वृद्धाश्रम व इतर सामाजिक संस्थाना दिलेल्या मदतीबद्दल त्यांचे सामाजिक क्षेत्रातून आभार व्यक्त केले जात आहेत.