साखर कारखान्यांनी थकीत FRP रक्कम द्यावी नाहीतर रस्त्यावर उतरून आंदोलन
प्रियांका ढम - पुणे
साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांना FRP ची थकीत रक्कम व्याजासह ताबडतोब दिली पाहिजे व कामगारांचे पेमेंट लवकरात लवकर द्या.अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन केले जाईल.असा इशारा भाजप किसान मोर्च्याच्या वतीने दिलेल्या निवेदनात दिला आहे हे निवेदन साखर संकुल येथे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्याकडे देण्यात आले.
याप्रसंगी प्रदेश किसान मोर्चाचे सरचिटणीस वासुदेव नाना काळे, भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, जिल्हा संघटन सरचिटणीस धर्मेंद्र खांडरे, जिल्हा किसान मोर्चा अध्यक्ष संजय थोरात, जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण काळभोर, मार्केट कमिटीचे संचालक राहुल गवारे,किसान मोर्चाचे अध्यक्ष काकासाहेब खळदकर,घोडगंगा कारखान्याचे तज्ञ संचालक सुरेशराव पालांडे, ता. सरचिटणीस रघुनंदन गवारे माऊली शेळके, संजय घुंडरे, माऊली चौरे, केशव कामठे व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.