नवरात्रीमध्ये भाविकांना तुळजापूर नगरीत नाही प्रवेश:live होणार आईतुळजाभवानीचे दर्शन.
राम जळकोटे- तुळजापूर
यंदाच कोरोनाच महाभयंकर संकट हे देवदेवतांच्या दारी ही आलं आहे.वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यावर्षीचे महाराष्ट्राच आराध्यदैवत. कुलुस्वामीनी आईतुळजाभवानी चे दर्शन हे भाविकांना प्रत्यक्ष रुपात मिळणार नसून ते live च्या रुपात www.shri tuljabhavani.org.या मंदिर कमिटीच्या अधिकृत संकेतस्थळ वर घेता येणार आहे. अशी माहिती तुळजापूर तालुक्याचे तहसीलदार .सौदागर तांदळे यांनी दिली आहे. गेली ६ महिने पासून अनेक धार्मिक स्थळे हे या महामारीच्या काळात वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे प्रशासनाच्या आदेशानुसार बंद करण्यात आले होते. अनेक भाविकांनी हे कोरोनाच सावट आता नवरात्री पर्यंत तरी जाईल आणि आई तुळजाभवानी चे दर्शन आम्हाला घेता येईल या आशेने आतुर होते.परंतु या वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ते घेणे अशक्य झाले आहे. मंदिर कमिटीच्या वतीने भाविकांसाठी आपल्या मोबाईल वरती आई तुळजाभवानी चे दर्शन घेण्याकरिता सोय करण्यात आली आहे.
या नवरात्रीच्या काळात मेळावा, आणि समारंभ मध्ये ५० व्यक्तींच्या पुढे प्रवेश मिळणार नाही. सामाजिक बांधिलकी राखत प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करीत हा नवरात्र सोहळा पार पडणार आहे.