राष्ट्रवादी विद्यार्थी कॉग्रेस आणि राष्ट्रवादी युवक कॉग्रेस यांच्या संयुक्त विद्यामानाने भव्य अशा पुणे जिल्हास्तरीय किल्ला उभारणे स्पर्धा 2020 चे आयोजन
मिलिंद लोहार- पुणे
'कोरोना'च्या महामारीमुळे शाळा 'लॉकडाउन' झाल्या आहेत. त्यामुळे मुले 'मोबाईल' आणि 'टीव्ही गेम'मध्ये व्यस्त झाली आहेत. पोकेमॉन आणि कार्टूनच्या जगात वावरणाऱ्या आजच्या मुलांना शिवरायांचा इतिहास, गड-किल्ले यांची जवळून ओळख व्हावी, गडकिल्ल्यांचे बीज त्यांच्या बालमनात रुजावे तसेचं दिवाळीतील किल्ले बनवण्याची परंपरा अखंडित राहावी अशा तिहेरी हेतूने राष्ट्रवादी विद्यार्थी कॉग्रेस आणि राष्ट्रवादी युवक कॉग्रेस यांच्या संयुक्त विद्यामानाने भव्य अशा पुणे जिल्हास्तरीय किल्ला उभारणे स्पर्धा 2020 चे आयोजन प्रचंड आनंदाने करीत आहोत. त्यातून मुलांच्या कलागुणांना वाव मिळेल आणि त्यांना किल्ल्यांबद्दल ओढ निर्माण होईल हाही उदात्त हेतू या आयोजनामागे आहे. तरी जिल्हयातील सर्व नागरिकांना आम्ही आवाहन करीत आहोत की, आपण आपल्या मुलांना प्रोत्साहन देऊन सामाजिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक, पर्यावरणीय संदेश देणारे किल्ले तयार करून या स्पर्धेत सहभाग घ्यावा. व गडकिल्ले संवर्धनाच्या मोहिमेस हातभार लावावा. हि नंम्र विनंती..!
चला तर मग, या दिवाळीत एक किल्ला नक्कीच बनवूया!!
• प्रथक क्रमांक 1,11,111
• द्वितीय क्रमांक 55,555
• तृतीय क्रमांक 21,121
• उत्तेजन्नार्थ 11,111
• प्रत्येक तालुक्यातून प्रथम येणाऱ्या स्पर्धेकास रोख रूपये 5000 प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येईल.
• स्पर्धेतील सर्व सहभागी स्पर्धेकांना प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देण्यात येईल.
नियम आणि अटी :
1) स्पर्धा फक्त पुणे जिल्हयाकरीता मर्यादित परंतु खुली असेल.
2) सदर स्पर्धेकरीता वयाचे कोणतेही बंधन नाही.
3) प्रत्येक स्पर्धकाची नाव नोंदणी आवश्यक आहे.
4) नाव नोंदणी नसल्यास किल्ला स्पर्धेस ग्राह्य धरला जाणार नाही.
5) स्पर्धेच्या दिवशी किल्ल्याचे काम पूर्ण झालेले असावे.
6) तयार केलेल्या किल्याचे पाच फोटो वेगवेगळया बाजूने किंवा अंगाने आणि किल्ला तयार करत असतानाचा एक विडिओ Compress करून (त्यातील एक फोटो स्वता:चा किल्यासोबत) दिलेल्या लिंक वर अपलोड करावा.
7) सहभागाच्या अंतिम तारखेला संबंधित लिंक बंद करण्यात येईल.
8) किल्ला हा घरीचं परंतु प्रामाणिकपणे केवळ स्पर्धेकानेचं तयार करावयाचा आहे.
9) पर्यावरणाला बाधक अशा वस्तूचा उपयोग किल्ल्यासाठी नसावा.
10) अंतिम तारखे नंतर कोणत्याही प्रकारे प्रवेश दिला जाणार नाही.
11) स्पर्धेचा निकाल हा वर्तमानपत्रातून तसेचं फेसबुकपेजच्या माध्यमातून जाहीर केला जाईल.
12) पारितोषिक वितरण कार्यक्रमाची माहिती सुध्दा फेसबुकपेजवर दिली जाईल.
13) परीक्षक किंवा संयोजकास शंका आल्यास ते संबंधित स्पर्धेकाला त्यांच्या समोर किल्ला तयार करण्यास सांगतील तर त्याची तयारी सहभागी सर्व स्पर्धेकांनी ठेवायची आहे.
14) स्पर्धेकांनी सदर स्पर्धेकरिताचं किल्ला तयार करावयाचा आहे. दुसऱ्या इतर स्पर्धेतील किल्ला स्पर्धेत ग्राह्य धरला जाणार नाही. असे आढळून आल्यास संबंधित स्पर्धेकांस बाद ठरवण्यात येईल.
14) स्पर्धेची नाव नोंदणी (संपूर्ण नाव, पत्ता, व्यवसाय, वय) दि. १५-११-२०२० पर्यंत killespardha20@gmail.com किंवा 8432850009 वरती फक्त व्हाट्स अँप मेसेज करणे.
15) मुदतीपूर्व नाव नोंदणी न करणाऱ्या स्पर्धकांना स्पर्धेत सहभाग घेता येणार नाही.
या लिंक वरती किल्ल्याचा फोटो व विडिओ अपलोड करावा.
https://docs.google.com/.../1FAIpQLSew.../viewform...