Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतंर्गत टप्पा 3 मध्ये पाटण मतदार संघातील आराखडा तयार

प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतंर्गत टप्पा 3 मध्ये पाटण मतदार संघातील आराखडा तयार

हेमंत पाटील -पाटण 


  प्रधानमंत्री ग्रामसडक योजना टप्पा 03 मध्ये केंद्र शासनाकडून आलेल्या मार्गदर्शक सुचना (गाईडलाईन्स) नुसार पाटण विधानसभा मतदारसंघातील 07 प्रमुख रस्त्यांची कामे प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतंर्गत करण्याकरीता मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंच्या मार्गदर्शनाखाली आराखडा तयार केला असून सदरच्या 07 रस्त्यांच्या कामांचा प्रस्ताव राज्य शासनामार्फत केंद्र शासनाकडे मंजुरीकरीता सादर करण्याचे काम प्रगतीपथावर आहे.

प्रधानमंत्री ग्रामसडक योजना टप्पा 03 मध्ये पाटण विधानसभा मतदारसंघाकरीता केंद्र शासनाकडून आलेल्या मार्गदर्शक सुचना (गाईडलाईन्स) नुसार 44.100 किलोमीटर अंतरापर्यंत रस्ते प्रस्तावित करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. यामध्ये प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या निकषामध्ये बसणाऱ्या रस्त्यांचे सर्व्हेक्षण तसेच तपासणी करुन हा आराखडा तयार करण्यात आला आहे.ग्रामीण रस्त्यांची दर्जोन्नती करणे हे या योजनेचे मुख्य उद्ष्टि असून पात्र गांवे व वाडयावस्त्या यांना बारमाही रस्त्यांनी जोडण्याकरीताचा हा आराखडा तयार केला आहे.केंद्र शासनाच्या निकषानुसार पाटण विधानसभा मतदारसंघातील एमडीआर 29 ते बोंद्री रस्त्यातंर्गत पिपंळोशी ते बोंद्री 01.00 किमी, कातवडी पोहोच रस्ता 01.00 किमी, मेष्टेवाडी ते पिंपळोशी 03.00 किमी, बेलवडे खुर्द ते सांगवड ते पापर्डे ब्रु// 6.700 किमी, पापर्डे ते दिवशी ब्रु//  ते एमडीआर नाडे ढेबेवाडी जोडणारा रस्ता 06.00 किमी., बांबवडे ते गायमुखवाडी ते कळंबे 07.00 किमी, एमडीआर 37 ते केळोली फाटा ते केळोली वरची केळोली ते विरेवाडी रस्ता 06.00 किमी, सणबूर रुवले तामिणे वाल्मिकी रस्ता 14.00 किमी व खबालवाडी खालची ते खबालवाडी वरची रस्ता 3.100 किमी  असे एकूण  मतदारसंघातील प्रमुख  47.800 किमीचे 07 रस्ते आराखडयात समाविष्ठ करण्यात आले आहेत.

प्रधानमंत्री ग्रामसडक योजना टप्पा 03 आराखडा तयार करणेसंदर्भात महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था,साताराचे कार्यकारी अभियंता एस.पी.खलाटे,उपअभियंता विलास पानस्कर यांनी गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंची भेट घेवून ना.शंभूराज देसाईंचे सुचनेवरुन हा आराखडा तयार करण्यात आला आहे.उद्ष्टिानुसार सदरचे 07 रस्ते हे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंच्या मार्गदर्शनाखाली प्रस्तावित करण्यात आले आहेत. केंद्र शासनाकडून प्रस्तावित रस्त्यांच्या कामांकरीता निधी उपलब्ध होणार असून रस्त्यांची कामे पुर्ण झालेनंतर 05 वर्षे या रस्त्यांच्या देखभाल दुरुस्तीच्या कामांची जबाबदारी राज्य शासनाची राहणार आहे.

07 रस्त्यांच्या कामांना लवकर निधी मिळणेकरीता मुख्यमंत्री यांचेमार्फत केंद्र शासनाकडे


पाठपुरावा करणार.

प्रधानमंत्री ग्रामसडक योजना टप्पा 03 मध्ये प्रस्तावित केलेल्या 

पाटण मतदारसंघातील 07 रस्त्यांच्या कामांना लवकरात लवकर आवश्यक असणारा निधी मिळणेकरीता राज्याचे मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे यांचेमार्फत केंद्र शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचेही गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी सांगितले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies