Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

भारतीय महिला धावपटू ललिता बाबर यांची माणगांव तहसीलदारपदी नेमणूक

 भारतीय महिला धावपटू ललिता बाबर यांची माणगांव तहसीलदारपदी नेमणूक

रविंद्र कुवेसकर -उतेखोल/माणगांव


भारतीय महिला धावपटू ललिता बाबर यांची तहसीलदार म्हणुन माणगांव येथे नेमणूक झाली असुन स्पोर्ट्समन या कोट्यातून त्यांची निवड झाली आहे. त्या राष्ट्रीय विक्रमवीर आणि आशियातील सर्वोत्कृष्ट धावपटू आहेत. 

सातारा जिल्हय़ातील माण परिसरात असलेल्या मोही या छोटय़ाशा खेडेगावात जन्मलेल्या  ललिता बाबर जागतिक स्तरावर पिटी उषा व कविता यांचा वारसा पुढे नेण्याची क्षमता असलेल्या खेळाडू आहेत. शेतमजूर कुटुंबातील या खेळाडूने जिल्हा स्तरावरील शालेय मैदानी स्पर्धांमध्ये मध्यम व लांब अंतराच्या शर्यतींमध्ये सातत्यपूर्ण यश मिळविले. त्यानंतर त्यांनी राज्य व राष्ट्रीय स्पर्धांमध्ये आपल्या कौशल्याचा ठसा उमटविला.

     


  फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स ॲन्ड इंडस्ट्रीने (फिक्कीने) आणि भारताच्या युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालयाने २०१५ सालचे क्रीडा पुरस्कार प्रदान करताना बाबर यांना स्पोर्ट्‌स पर्सन ऑफ दी ईयर असे म्हटले होते. त्यांना अर्जुन पुरस्कारही मिळाला आहे. आंतराष्ट्रीय खेळाडू आपल्या माणगांवला तहसिलदार म्हणुन लाभल्याने माणगांवचे नाव उंचावले आहे.  माणगांवकरांकडुन नवनियुक्त प्रभारी तहसिलदार यांचे अभिनंदन व स्वागत होत आहे.



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies