Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

नाशिकचे जगविख्यात चित्रकार प्रफुल्ल सावंत यांच्याही "फ्लोटिंग ब्युटी" या चित्र कृतीची सेमीफायनल म्हणून निवड

 

नाशिकचे जगविख्यात चित्रकार प्रफुल्ल सावंत यांच्याही "फ्लोटिंग ब्युटी" या चित्रकृतीची "न्यूयॉर्क" येथे सेमीफायनल मध्ये निवड 

महाराष्ट्र मिरर टीम-नाशिक

नुकत्याच अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात आयोजित केलेल्या आर्ट रिनीवल सेंटर या जगविख्यात संस्थेतर्फे आयोजित केलेल्या " 15th आर्क सलून इंटरनॅशनल कॉन्टेस्ट "मध्ये जगभरातून 130 देशातून 5000 चित्रकारांच्या चित्रकृती एन्ट्रीज म्हणून सबमिट झाल्या होत्या यामध्ये सर्वोत्कृष्ट पंधराशे चित्रकारांना नुकतेच सेमी फायनल लिस्ट म्हणून घोषित करण्यात आले त्यामध्ये नाशिकचे जगविख्यात चित्रकार प्रफुल्ल सावंत यांच्याही "फ्लोटिंग ब्युटी" या ऑइल कलर माध्यमातील चार बाय सहा फुटाच्या चित्र कृतीची सेमीफायनल म्हणून निवड करण्यात आली 

या कॉम्पिटिशन मध्ये यापूर्वीही प्रफुल्ल सावंत यांना 2010 आणि 2011 मध्ये जागतिक पारितोषिक प्राप्त झालेली आहे प्रफुल्ल सावंत हे नाशिक येथे राहणारे असून आत्तापर्यंत त्यांना अमेरिका ,जर्मनी, इटली, ऑस्ट्रेलिया ,तुर्की ,मेक्सिको फ्रान्स, बुल्गारिया ,अल्बानिया ,चायना अशा अनेक देशातून 43 इंटरनॅशनल अवॉर्ड मिळालेली आहे . तसेच 2015 मध्ये देखील नुयॉर्क येथील अमेरिकन वॉटर कलर सोसायटी  या जगविख्यात संस्थेचे  जागतिक पारितोषिक  मिळविणारे  ते  गेल्या दीडशे वर्षातील पहिले भारतीय आहे ,

21 पेक्षा जास्त देशांनी त्यांना आत्तापर्यंत गेस्ट चित्रकार म्हणून त्या-त्या देशांमध्ये प्रदर्शनासाठी तसेच पैंटिंग डेमोंस्ट्रेशन  देण्यासाठी आणि पैंटिंग वर्कशॉप घेण्यासाठी निमंत्रित केलेले आहे अशाप्रकारे निमंत्रित होणारे भारतातील हे एकमेव चित्रकार असून वर्षभरात साधारण सहा ते आठ महिने भारताबाहेर सातत्याने चित्रप्रदर्शन, कार्यशाळा यासाठी वेगवेगळ्या देशात त्यांची भ्रमंती दरवर्षी चालू असते किमान एका वर्षात दहा ते बारा देशांमध्ये त्यांना वेगवेगळ्या जागतिक स्तरावरील उपक्रमांकरिता निमंत्रित केले जाते तसेच अमेरिकन जगविख्यात आर्ट मटेरियल "डॅनियल स्मिथ आर्टिस्ट मटेरियल कंपनीचे" ते  ग्लोबल ब्रँड ॲम्बेसिडर असून त्यांच्या नावे "डॅनियल स्मिथ प्रफुल्ल सावंत मास्टर आर्टिस्ट वॉटर कलर सेट" देखील त्या कंपनीने जगभरात पब्लिश केलेला आहे असा सन्मान मिळवणारे प्रफुल्ल सावंत हे पहिले भारतीय असून याप्रमाणे अनेक पारितोषिकेही जागतिक स्तरावर मिळवणारे ते पहिले भारतीय आहेत .,प्रफुल्ल सावंत हे जलरंग , ऑइल कलर ,पेस्टल कलर ,चार्कॉल, अॅक्रीलिक कलर आदी माध्यमात सहजतेने काम करतात. तसेच जगभरात वास्तववादी चित्रकार म्हणून त्यांची विशेष ख्याती आहे., प्रत्यक्ष स्थळावर निसर्गचित्रण करणे तसेच व्यक्तिचित्र करणे आणि रचनाचित्र करणे हे त्यांचे आवडते विषय आहेत जगभरात अनेक कला विद्यार्थी आणि चित्रकार त्यांच्याकडे शिकण्यासाठी सातत्याने इच्छुक असतात आत्तापर्यंत त्यासाठी जगातील विविध देशात 60 पेक्षा जास्त पेंटिंग वर्कशॉप घेऊन अनेक देशातील 15000 पेक्षा जास्त  चित्रकारांना व विद्यार्थ्यांना त्यांनी पैंटिंग शिकविले आहे आणि अजूनही शिकवत आहेत यापूर्वी यांना भारतातील 45 पेक्षा जास्त राज्य ते राष्ट्रीय शिष्यवृत्ती, पारितोषिकेही प्राप्त झालेली आहेत  बॉम्बे आर्ट सोसायटी ची मानाची समजली जाणारी बेंद्रे हुसेन स्कॉलरशिप, कॅमल आर्ट फौंडेशनची युरोप टूर तसेच , आर्ट सोसायटी ऑफ इंडिया,महाराष्ट्र राज्याचा राज्य पुरस्कार देखील त्यांच्या चित्र कृतींना मिळालेला आहे भारतातही नाशिक, मुंबई ,दिल्ली अशा अनेक ठिकाणी त्यांची चित्रप्रदर्शने झालेली आहेत ,विविध देशातील कला संस्था आणि म्युझियम्स तर्फे होणाऱ्या निमंत्रित चित्रकारांसाठी च्या प्रदर्शनासाठी नेहमीच प्रफुल्ल सावंत यांच्या चित्र कृतींना आमंत्रित केले जाते अशा  इंटरनॅशनल इन्व्हिटेशनअल एक्झिबिशन मध्ये आत्तापर्यंत 85 पेक्षा जास्त चित्रप्रदर्शनात त्यांची चित्रे जगभरात विविध देशातील विविध शहरांमध्ये  प्रदर्शित झालेले आहे. तसेच भारत सरकारच्या स्वच्छता अभियानाचे नाशिक महानगरपालिकेचे ते ब्रँड ॲम्बेसिडर देखील आहेत.

त्यांच्या या कार्याचा आलेख आणि त्यांच्या चित्र कृतींचा आपण फेसबुक वर आणि इंस्टाग्रामवर आनंद घेऊ शकतात

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies