तुंगारली डॅममध्ये वसईचा एक जण बुडाला,शोधकार्य सुरूच
महाराष्ट्र मिरर टीम-लोणावळा
आपल्या मित्र मंडळी व कुटुंब बरोबर फिरायला आलेला अमित गुप्ता रा. वसई वय २४वर्ष हा तुंगार्ली डॅममध्ये पोहण्यास उतरला असता पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाला.
कालपासुन पोलीस आणि शिवदुर्ग रेस्क्यु टीम शोध घेत आहे.काल रात्र उशीरा पर्यंत शोध कार्य सुरू होते रात्री उशीरा शोधकार्य थांबवले
आज दि. १७नोव्हेंबर २०२०रोजी शोध कार्य सुरु आहे अद्याप शोध लागलेला नाही.
शिवदुर्गटीम केदार देवळे , सागर कुंभार , प्रविण देशमुख, अजय शेलार, प्रणय अंबुरे, राहुल देशमुख, दुर्वेश साठे ,सतिष मेलगाडे , अशोक उंबरे , अभिषेक गायकवाड , राजेंद्र कडु, पुनिकेत गायकवाड, सारंग गायकवाड, विकास मावकर ,राजु पाटील, सुनिल गायकवाड, भगवान घनवट ,अनिल सुतार ,आनंद गावडे, अनिल आंद्रे, चंद्रकात बोंबले आदी टीम शोध घेत आहेत.