सातारा शहर शिवसेनेच्या वतीने हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख मा बाळासाहेब ठाकरे यांची पुण्यतिथी साजरी
प्रतीक मिसाळ-सातारा
अखंड हिंदुस्थानचे प्रेरणास्थान आणि तमाम शिवसैनिकांचे श्रद्धास्थान हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख मा बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथी निमित्त सातारा शहर शिवसेनेच्या वतीने शहरप्रमुख बाळासाहेब शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना शहर कार्यालय , *मातोश्री सोमवारपेठ , सातारा येथील शिवसेनेच्या जनसंपर्क कार्यालयात शिवसेनाप्रमुखांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी पक्षाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनाप्रमुखांच्या आठवणींना उजाळा दिला . या कार्यक्रमास शहरप्रमुख बाळासाहेब शिंदे , उपजिल्हाप्रमुख हरिदास जगदाळे , तालुकाप्रमुख . दत्ताभाऊ नलावडे , उपतालुकाप्रमुख रमेश बोराटे , वाहतुकसेना तालुकाप्रमुख सचिन जगताप उपशहरप्रमुख निलेश मोरे , अनिल काशिद , सागर धोत्रे सयाजी शिंदे , शिवाजीराव इंगवले तसेच विभागप्रमुख सुनील भोसले , नितीन लकेरी सुमित नाईक , महेश पाटील , संतोष निगडकर संग्राम कांबळे शिवाजीराव पवार जयवंत पवार प्रतिक शेडगे श्रीनिवास जाधव धनंजय शिंदे नारकर आशुतोष पारंगे शिरीष दिवाकर तसेच अनेक शिवसैनिक व नागरिक उपस्थित होते .