सातारा ते कराड स्वाभिमानी शेतकरी संघटना काढणार आक्रोश मोर्चा
Team Maharashtra Mirror11/19/2020 06:04:00 AM
0
Top Post Ad
सातारा ते कराड स्वाभिमानी शेतकरी संघटना काढणार आक्रोश मोर्चा
प्रतीक मिसाळ-सातारा
शेतकऱ्यांचे विविधप्रश्नांची सोडवणूक करण्याचे आश्वासन देवून देखील केंद्र व राज्य सरकार दुर्लक्ष करीत असल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त सातारा ते कराड आक्रोश मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे . महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत नियमित कर्जदार यांना जाहीर केलेले ५० हजार रुपयांचे अनुदान तातडीने देण्यात यावे . लॉक डाऊन काळातील घरगुती तसेच व्यवसायीक यांचे संपूर्ण वीज बिल माफ करावे . त्याचप्रमाणे शेती पंपाचे थकीत बिल माफ करून सक्षम यंत्रणा नेमून येथून पुढे योग्य पद्धतीने वसूल करण्यात यावे . साखर कारखानदारांनी एक रक्कमी ऊस दर द्यावा आणि जो कारखाना देणार नाही त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावे . तसेच गायीच्या दुधावर दिले जाणारे ५ रुपये अनुदान तातडीने चालू करावे . त्याच प्रमाणे केंद्र शेतकरी कृषी विधेयक महाराष्ट्रात लागू करण्यात येवू नये , अशा विविध मागण्यासाठी आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे . दि .२३ नोव्हेंबर २०२० रोजी सकाळी ९ वाजता माजी खासदार राजू शेट्टीयच् या उपस्थितीत साताऱ्यात छ.शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून व गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांना निवेदन देवून मोर्चाला सुरुवात होणार आहे . पुढे काशीळ येथे पहिला मुक्काम तर दि .२४ रोजी खासदार श्रीनिवास पाटील यांना निवेदन देवून खोडशी , ता . कराड येथे दुसरा मुक्काम होवून दि .२५ रोजी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना निवेदन आणि पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांचे घरासमोर शांतता आंदोलन आणि निवेदन देवून स्व.यशवंतराव चव्हाण समाधी स्थळी शेतकरी चिंतन सत्याग्रह होवून आंदोलनाची सांगता होणार आहे , अशी माहिती जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांनी दिली .