रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान आयोजित दिवाळीनिमित्त राज्यस्तरीय गडकिल्ले स्पर्धा.
राम जळकोटे-तुळजापूर
सध्या संपूर्ण महाराष्ट्रात समाजकार्यचा वसा हाती घेऊन शिवविचार आणि समाजकार्य मोठया उपक्रमामधून पार पाडत असलेल्या रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य या सेवाभावी संस्थेच्या वतीने महाराष्ट्र भर यंदाच्या दिवाळी मुहूर्तावर राज्यस्तरीय गडकिल्ले स्पर्धा आयोजित केली आहे.ही स्पर्धा लहान गट(८ ते १५) आणि मोठा गट(१५ ते २५ ) करिता आहे.समाजात ऐतिहासिक वारसा हा परंपरेने चालू रहावा आणि लहानमोठ्याच्या कलागुणांना वाव मिळावा या हेतूने ही स्पर्धा आयोजित केली आहे.ही स्पर्धा दि.५ ते दि.२० नोव्हेंबर पर्यन्त असून याची नाव नोंदणी चालू झाली आहे.स्पर्धेकांनी आपली नावे, मुंबई विभाग जितेंद्र तेलवणे 7738121278,पुणे विभाग हरिदास भिसे 8605778857,कोकण विभाग रुपेश मोकल 8356037764,पश्चिम महाराष्ट्र विभाग कृष्णा पाटील 8830838035,उत्तर महाराष्ट्र विभाग कुणाल पाटील 8788907293,विदर्भ मराठवाडा विभाग ज्ञानेश्वर काळे 9763851003 आपल्याआपल्या भागातील संयोजकांना संपर्क साधायचा आहे.अशी माहिती रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य चे उपाध्यक्ष. निलेश जगदाळे आणि संयोजक वर्ग यांनी बोलतेवेळी दिली आहे.