Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

पोलीस हवालदाराचा मुलगा झाला नौदलाचा अधिकारी

 पोलीस हवालदाराचा मुलगा झाला नौदलाचा अधिकारी 

मिलिंद लोहार- पुणे


  पुणे ग्रामीण पोलीस दलातील लोणीकंद  पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार प्रदीप चंद्रराव जाधव रा. परींच ता. पुरंदर जि. पुणे यांचा मुलगा प्रसाद प्रदीप जाधव याची  भारतीय नौदलाच्या नेव्हल अकॅडमी कोचीन येथे निवड झाली असून प्रसाद हा  लहानपणापासून आर्मी स्कूल मध्ये शिकला आहे. जिद्द, चिकाटी व आई वडिलांचा खंबीर पाठिंबा असल्यामुळे प्रसादने इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतचे शिक्षण  राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज डेहराडून राज्य उत्तराखंड येथे घेतले असून तेथे त्याची निवड संपूर्ण भारतातील 58 हजार  विद्यार्थ्यांपैकी 22 विद्यार्थ्यांमध्ये झाली होती.

    राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज डेहराडून ही संपूर्ण  भारतातील ब्रिटिश कालीन 'अ' वर्गातील स्कूल असून तेथून नॅशनल डिफेन्स अकॅडमी NDA करिता बेस्ट कॅडेट तयार करून पाठविले जातात. त्यावेळी त्यांना यूपीएससी सारख्या कठीण परीक्षा द्याव्या लागतात. SSB (Service selection Board ) तसेच मेडिकल, शारीरिक, बौद्धिक चाचण्या  होऊन NDA करीता निवड होते. प्रसादने NDA मधून B. Tech पदवी घेतली होती.

 

प्रसाद त्याच्या यशाचे संपूर्ण श्रेय त्याची आई धनश्री प्रदीप जाधव यांना देत असून त्याच्या यशामागे आईचे फार मोठे योगदान असून वडिलांनी त्यांची पोलिसातील नोकरी सांभाळून होईल तशी प्रामाणिक मदत केल्याचे सांगितले आहे. प्रसादची  मोठी बहीण डॉ. प्रतीक्षा कडू देशमुख, मेहुणे मेजर सुहेल कडू देशमुख यांनी मोलाचे मार्गदर्शन केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies