पिंपळोली येथे किरकोळ वादातून स्कूल बस जाळण्याचा प्रकार
नेरळ पोलिसांनी घेतले पाच जणांना ताब्यात
महाराष्ट्र मिरर टीम-कर्जत
मिळालेल्या माहिती नुसार कर्जत तालुक्यातील नेरळ- पिंपळोली येथे राहणारे चंद्रकांत सोनावले यांच्या मालकीची असलेली खाजगी स्कूल बसेस ह्या लॉकडाऊन काळात स्कूल बंद असल्याने नेहमी प्रमाणे गावाशेजारी मोकळ्या जागेत उभ्या करण्यात आल्या होत्या.मध्यरात्रीच्या सुमारास ह्या स्कूल बसला लागलेल्या आगीने पेट घेतल्याने अचानक पडलेल्या प्रकाशाने गावातील स्थानिकांनाच्या मदतीने ही बाब समोर आली.
घटनेचे गांभीर्य ओळखून कर्जत तालुक्याचे डीवायएसपी अनिल घेर्डीकर तसेच नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तानाजी नारनवर यांनी घटनास्थळी धाव घेतली.
याबाबत बस मालक चंद्रकांत सोनावले यांच्याशी संपर्क साधला असता सोनावले यांनी गावातील काही मंडळींशी किरकोळ वाद झाल्याचे सांगितले तसेच,त्या वादातूनच हा प्रकार घडला असल्याचे सोनावले यांनी आपला संशय व्यक्त केला आहे. सोनावले यांनी आपली प्रतिक्रिया on-camera देणे टाळले आहे. गावात झालेला किरकोळ वाद ह्या बाबत नेरळ पोलीस ठाण्यात तक्रार देखील देण्यात आल्याचे समजते.
याबाबत आता नेरळ पोलिसांनी पाच संशयीत आरोपींना ताब्यात घेतले असल्याचे समजते तर अधिक तपास नेरळ पोलीस करीत असून,गावात सध्या ताण-तणाव वाढू नये म्हणून गावात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.