भेट... खाकी वर्दीतल्या मराठमोळ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी.....शेतकऱ्यांच्या कैवाऱ्यांशी
महाराष्ट्र मिरर टीम-नासिक
शिवसेना नासिक जिल्हा संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांनी नासिक परीक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर यांची सदिछा भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते.
दिघावकर पुढे म्हणाले की, आजही हे विचार, हेच ध्येय, हिच निष्ठा जो पर्यंत जगात आहे,आणि छत्रपतींच्या भगव्या विचारांची माणसे आहेत.तो पर्यंत शेतकरी कधीच पोरका रहाणार नाही.
शिवसेना नासिक जिल्हा संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांनी नासिक परीक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर यांची सदिछा भेट घेतली....यावेळी त्यांच्या समवेत महानगरपालिका विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते,नगसेवक सुधाकर बडगुजर, उत्तर महाराष्ट्र महिला आघाडी संपर्कनेत्या सत्यभामाताई गाडेकर आदी मान्यवर होते...
भेटी अंतरी एका मराठमोळ्या राजकारणी व मराठमोळ्या अधिकार्यांसमवेत (दोघेही नासिक जिल्ह्याचे भुमीपुत्र) गप्पांच्या ओघात भाऊंनी सहज विचारले पोलीस अधिकार्यांच्या दालनात तेही,आपल्या पाठीमागे छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो बघता,मनात आले सहज विचारले असता... दिघावकर साहेबांनी अतिशय सुंदर वाक्यात,कमी शब्दात आपले विचार प्रगट केले.....