किल्ले बनविण्यासाठी मुलांची लगबग सुरू
अमूलकुमार जैन -मुरुड
दिवाळी सण काही दिवसांवर येऊन ठेपल्याने मुरूड शहरातील व पंचक्रोशी परिसरातील लहान मुलांची किल्ले तयार करण्यासाठी लगबगीने सुरू झाली आहे.
मुरूड पोलिस लाईन येथील श्लोक सुरेश वाघमारे व इतर मुले किल्ले करण्यासाठी विविध किल्लाच्या प्रतिकृती बनवत आहेत.किल्लावर ठेवण्यासाठी मृतीची खरेदी करण्यात येत आहे.आपला किल्ला इतरांपेक्षा वेगळा व्हावा या हेतुने मुले परिश्रम घेत आहेत. किल्लांची प्रतिकृती तयार करताना मावळे, तोफ,किल्ल्याचे प्रवेशव्दार, शेतकरी, महिला-पुरूष, व्दारपाल,मावळे लढणारे मावळे विविध भर दिला जात आहे.दुकानांतही अशा प्रतिकृतीची मागणी आहे. या वर्षी मुलांकडून विविध प्रकारची खेळणी, तोफ, छत्रपती शिवाजी महाराज,मावळे आधिच्या प्रतिकृतीची मागणी होत आहे. यामध्ये माती व प्लास्टिकच्या अशा दोन प्रकारच्या प्रतिकृती आहेत प्लास्टीक पेक्षा मातिची प्रतिकृती महाग आहे. तरीही मुला-मुलीकडून मातीच्या प्रतिकृतीची मागणी जास्त आहे.त्यामुळे कमीत कमी किमतीत माती खेळणी व प्रतिकृती उपलब्ध करून देण्यात आल्याने विक्रेते- रूपेश राजपुरकर यांनी सांगितले.