कर्जतच्या वडापावच्या प्रेमात "शिल्पा शेट्टी "
लवकरच होणार कर्जतकर
आदित्य दळवी
महाराष्ट्र मिरर टीम
कर्जत म्हटलं इथला निसर्ग हा नेहमीच सिमेंट च्या जंगलात राहणाऱ्यांना साद घालत असतो.इथली शुद्ध हवा घेऊन रिचार्ज होता येत .सह्याद्री पर्वत रांगांच्या कुशीत वसलेले कर्जत शहर आणि कर्जत तालुक्याचा ग्रामीण भाग.....ग्रामीण भाग आल्हाददायक वातावरण सगळ्यांना भुरळ घालत असतो,म्हणून कर्जत तालुक्याच्या पूर्व ग्रामीण भागात मोठमोठ्या सेलिब्रिटीची फार्म हाऊसेस तर काहींची विकेंड होम आहेत.
तुम्ही म्हणाल हे सगळे माहिती आहे आम्हाला नव्याने सांगण्याची काय आवश्यकता आहे.तर त्याच झालं असं की,कर्जतच्या चार फाट्यावर अभिनेत्री शिल्पा शेट्टीने वडापाव, पालक भज्जी ,कांदे भज्जीवर यथेच्छ ताव मारला ....तुम्हांला वाटेल की असेल कुठल्या तरी चित्रपटाचं शूटिंग... पण बरं का मंडळी....शूटिंग बिटिंग काही नाही.अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही आता कर्जतकर होणार आहे.त्यासाठी तिने कर्जतमधील 7 ते आठ फार्म हाऊस बघून झालेत.फार्म हाऊस पाहण्यासाठी शिल्पा शेट्टीची कर्जतमध्ये ही दुसरी फेरी आहे.कर्जत मध्ये इतर सेलिब्रिटी प्रमाणे आपल्या हक्काचं फार्महाऊस हवं या उद्देशाने अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिची आई सुनंदा शेट्टी गेले वर्षभर कर्जतमध्ये फेऱ्या मारत आहेत,अनेक इस्टेट एजंटांनी जागा,रेडी फार्म हाऊस दाखवून झाले आहेत.त्यातील एक पाहण्यासाठी शिल्पा शेट्टी कर्जतमध्ये आली होती.शिल्पा शेट्टीचा होकार मिळताच जागेची डील लवकरच होईल अस समजतं. त्यामुळे शिल्पा शेट्टी आता लवकरच कर्जतकर होणार यात शंका नाही.तोच फार्म हाऊस पाहण्यासाठी सुनंदा शेट्टी, शिल्पा शेट्टी कर्जतला आल्या आणि कर्जतच्या चारफाट्यावर वडापाव ,पालक आणि कांदे भज्जी खाल्ले,ते ही गाडीत बसून ,ज्यांना ज्यांना माहिती झालं की अभिनेत्री शिल्पा शेट्टी कर्जतमध्ये आली आहे त्यांनी कर्जत चारफाट्याच्या दिशेने कूच केलं. त्यांचे मोबाईल हे क्षणचित्र
टिपण्यासाठी त्यांचे मोबाईल सरसावले नाहीत तर दस्तुरखुद्द शिल्पा शेट्टीने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आणि तो तुफान व्हायरलही झाला.मग चर्चा तर होणारच!!!