आजपासून माथेरान -अमन लॉज मिनी ट्रेन शटल सेवा सुरू
चंद्रकांत सुतार -माथेरान
माथेरानच्या नगराध्यक्षा प्रेरणा प्रसाद सावंत तसेच माजी नगराध्यक्ष अजय सावंत आणि गटनेते प्रसाद सावंत , माजी नगराध्यक्ष विवेक चौधरी यांनी शटल सेवा सुरू करण्याबाबत मागणी करत पाठपुरावा केला होता ,त्यास खासदार श्रीरंग बारणे, खासदार, तथा रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी सकारात्मक मोलाचे सहकार्य केल्याने अखेर बुधवार 4/11/2020 रोजी अखेर अमन लॉज ते माथेरान शटल सेवा सुरू झाली. आज मिनी ट्रेन सुरू होणार म्हणून सकाळी मिनी ट्रेन च्या स्वागतासाठी नियोजित वेळेत सर्व माथेरान कर माथेरान स्टेशनवर गाडीची वाट पाहत होते परंतु आज पहिल्याच दिवशी गाडी सकाळी 9 वाजता माथेरानला पोहोचणार होती पण तांत्रिक कारणामुळे हीच गाडी दुपारी 1 वाजता माथेरान मध्ये दाखल झाली
आम्ही घरी राहून राहून बोर झालो आहोत, त्या मुळे थोडी भीती असली तरी सर्व सुरक्षित राहून थोडे मनाला चेज म्हणून आम्ही आज माथेरान ला आलो। आहोत, आणि पहिल्याच सुरू होण्याच्या पहिल्याच ट्रेन मध्ये आम्हाला ट्रॅव्हल करताना खुप मज्जा येत आहे
सलमान अख्तर--पर्यटक खारघर
सलमान अख्तर--पर्यटक खारघर