Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

शिवसेनेच्या मंत्र्यांकडून साताऱ्यात कायद्याची पायमल्ली,साताऱ्यात मंत्र्याच्या उपस्थिती मेळाव्याला वेगळा कायदा ?

शिवसेनेच्या मंत्र्यांकडून साताऱ्यात कायद्याची पायमल्ली,साताऱ्यात मंत्र्याच्या उपस्थिती मेळाव्याला वेगळा कायदा ?

             प्रतिक मिसाळ- सातारा

 लॉकडाऊन कालावधीत अन् पुढे ही अंत विधीला 20 जणांची उपस्तिथी सर्वसामान्य जनतेवर कायद्याचा धाक कायम असताना साताऱ्यात मात्र दोन मंत्र्यांनी कायद्याची पायमल्ली केल्याचे रविवारी दिसून आले . एका बाजूला जिल्हाधिकारी यांनी अंत्यविधीला २० लोकांची उपस्थिती ठेवण्याचे बंधन केले असताना शिवसेनेच्या दोन मंत्र्यांच्या उपस्थितीत मेळाव्याला तब्बल दोनशे पेक्षा जास्त पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थिती दर्शविल्याचे दिसून आले . नव्याने नियुक्त झालेले संपर्कमंत्री ना . उदय सामंत व ना.शंभूराज देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत साताऱ्यात रविवारी शिवसेना कार्यकर्त्यांची बैठक वजा मेळावा झाला . ह्या मेळाव्याला तब्बल दोनशे पेक्षा अधिक कार्यकर्त्यांनी हजेरी लावली . मंत्र्यांचे भाषण एक तास झाले . मात्र , मेळाव्याच्या अगोदर व दरम्यानच्या कालावधीत दोनशे व्यक्ती सतत एकमेकांच्या संपर्कात होते . ह्या कालावधीत अनेक जण मास्क काढून देखील एकमेकांशी संवाद साधताना दिसून आले. त्यामुळे एका बाजूला बिहार निवडणुकीत कायद्याची पायमल्ली होत असताना आता साताऱ्यात ही शिवसेना मंत्र्यांकडून कायद्याची पायमल्ली होत होती . अन् ती बाब उपस्थित गोपनीय विभागाचे पोलीस कर्मचारी ही उघड्या डोळ्याने पहात होते . त्यामुळे मंत्र्यांना जर कायद्याचे उल्लंघन करण्याची परवानगी मिळत असेल तर साताऱ्यात ही सर्वसामान्य जनतेला अंत्यविधीसाठी बिहार आणि साताराप्रमाणे उपस्थित लोकांची संख्या वाढवून मिळावी , अशी मागणी आता पुढे येणार आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies