26 नोव्हेंबरला शेकापचा एल्गार मोर्चा
जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत ! माजी आमदार पंडितशेठ पाटील
अमूलकुमार जैन-मुरुड
रायगड २६ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकरी कामगार पक्षाचा एल्गार मोर्चा असून गावातील असंख्य ग्रामस्थांनी या मोर्च्यात सहभागी होऊन आपल्या अस्तित्वासाठी लढू या जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठीच हा विराट मोर्चा आहे.कोरोना काळातील वीज माफ झालेच पाहिजे कंत्राटी शेती धोरण रद्द करणे फार आवश्यक आहे.ये पी एम सी कायदा अबाधित राहिलाच पाहिजे या सर्व प्रश्नासाठी आपण रस्त्यावर उतरल्याखेरीज हे सरकार आपल्याकडे लक्ष देणार नाही तेव्हा मोठ्या संख्येने अलिबाग जिल्हाधिक्कारि कार्यालयावर मोठ्या मोर्च्यात सहभागी होण्याचे आव्हान शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार पंडितशेठ पाटील यांनी केले आहे.
२६ नोव्हेंबर रोजी शेतकरी कामगार पक्षातर्फे मोठा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आयोजित केला आहे.या पूर्व तयारीसाठी काशीद येथे शेकाप कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.यावेळी ते आपल्या मार्गदर्शनपर भाषणात बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर तालुका चिटणीस मनोज भगत जिल्हा परिषद सदस्य नम्रता कासार सरपंच नम्रता खेडेकर सरपंच मनीष नांदगावकर सुनील दिवेकर,माजी सभापती बाबू नागावकर,मोतीराम पाटील चंद्रकांत कमाने सी एम ठाकूर अजित कासार आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
यावेळी माजी आमदार पंडितशेठ पाटील म्हणाले कि विद्यमान लोकप्रतिनिधी लोकांना नुकसानभरपाई देण्यात अपयशी ठरले आहेत.जे एस डब्लू व आर सी एफ मध्ये नोकऱ्या देतो अशी खोटी आश्वासने दिली गेली परंतु निवडून आल्यानं पूर्ण करता आली नाहीत.शेतकरी कामगार पक्षाचे सहकार्य लाभलेल्यानेच रायगडचा खासदार निवडून येत आहे.आमचा पराजय जरी झाला असला तरी आम्ही प्रभावाने खचून जाणार नाही.लोकांच्या प्रश्नासाठी सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचे यावेळी पाटील म्हणाले.
नारळ व सुपारीच्या बागा उध्वस्त झाल्या परंतु शानाकडून फार अल्प किंमत देण्यात आली बागायत जमिनीची साफसफाई करण्यासाठी मोठा खर्च झाला परंतु मदत थोडी मिळाली आहे.सदरचा मोर्चा हा लोकांच्या अस्तित्वासाठी आहे.
तालुका चिटणीस मनोज भगत आपल्या भाषणात नमूद केले कि विद्यमान आमदार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विधानसभेची निवडणूक संपताच स्वखर्चाने रस्ता तयार करणार होते.परंतु एक वर्ष झाला तरी ते काही करू शकले नाहीत.विद्यमान आमदार हे एक वर्षात कोणतीही भरीव कामगिरी करू शकलेले नाहीत.
उसरोळी ग्रामपंचायत सरपंच मनीष नांदगावकर यांनी शेकाप म्हणजे सामाजिक चळवळीचे व्यासपीठ आहे.येथे लोकांच्या प्रश्नाला प्रथम प्राधान्य दिले जाते.लोकांचे प्रश्न म्हणजे आपले प्रश्न समजणार पक्ष आहे.आपल्या अस्तित्वासाठी मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी होण्याचे आव्हान यावेळी त्यांनी केले.
यावेळी ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.या कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन माजी सभापती चंद्रकांत कमाने यांनी केले.