बामणोली , तापोळा बोटींगसह वासोटा पर्यटन लवकरच सुरु होणार आ . शिवेंद्रसिंहराजेंचा पाठपुरावा ; ना देसाईंच्या प्रशासनाला सुचना
प्रतीक मिसाळ -सातारा
व्यवसायिकांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे.
सर्वकाही सुरु झाले आहे . त्यामुळे बामणोली , तापोळा येथील बोटींग आणि वासोटा पर्यटन पुर्ववत सुरु करावे , अशी मागणी आ . श्रीमंत छ . शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे केली ना देसाई यांनी प्रशासनाला आठवडाभरात बामणोली , तापोळा येथील बोटींग आणि वासोटा किल्ला पर्यटन सुरु करण्याच्या सुचना केल्या .
यामुळे बोटींग आणि पर्यटन लवकरच पुर्ववत सुरु होण्याचा मार्ग खुला झाला आहे . यासंदर्भात आ . शिवेंद्रसिंहराजे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जावून ना . शंभूराज देसाई यांची भेट घेतली आणि बामणोली , तापोळा येथील बोटींग आणि वासोटा किल्ला पर्यटन पुर्ववत सुरु करण्याबाबत चर्चा केली . यावेळी भैरवनाथ बोट क्लबचे चेअरमन धनाजी संकपाळ , सचिव निलेश शिंदे , सर्व संचालक , बामणोलीचे सरपंच राजेंद्र संकपाळ यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ मोठ्या सं'येने उपस्थित होते . ना . देसाई यांना याबाबत निवेदनही देण्यात आले . कोरोना महामारीच्या पाश्वभूमीवर बामणोली , तापोळा येथील बोटींग आणि वासोटा किल्ला पर्यटन गेल्या सात ते आठ महिन्यांपासून जिल्हा प्रशासनाच्या सुचनेनुसार बंद आहे . दरम्यान , महाबळेश्वर येथील वेण्णा लेकमध्ये बोटींग आणि महाबळेश्वर आणि पाचगणी येथील पर्यटन सुरु करण्यात आले आहे . त्यामुळे बामणोली , तापोळा येथील बोटींग आणि वासोटा किल्ला पर्यटनही सुरु करणे आवश्यक आहे . बामणोली तापोळा परिसरातील हजारो लोकांचा उदरनिर्वाह बोटींग आणि पर्यटनावर अवलंबून आहे . गेल्या सात- आठ महिन्यांपासून व्यवसाय बंद असल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे . किमान दिवाळी नंतरच्या हंगामातील व्यवसायातून तरी येथील लोकांना उभारी मिळावी , यासाठी बामणोली , तापोळा येथील बोटींग आणि वासोटा किल्ला पर्यटन त्वरीत सुरु करण्यात यावे , अशी आग्रही मागणी आ . शिवेंद्रसिंहराजे यांनी केली . ना . देसाई यांनी आ . शिवेंद्रसिंहराजे यांच्या मागणीनुसार तत्काळ वन विभाग आणि अप्पर जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा केली आणि बामणोली , तापोळा येथील बोटींग आणि वासोटा किल्ला पर्यटन सुरु करण्याच्या सुचना केल्या आ . शिवेंद्रसिंहराजे यांच्या पाठपुराव्यामुळे या चालू आठवड्यात बामणोली , तापोळा येथील बोटींग आणि वासोटा किल्ला पर्यटन सुरु करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे . त्यामुळे बामणोली आणि तापोळा परिसरातील हजारो व्यावसायिकांचा मोठा प्रश्न सुटला असून यासाठी आ . शिवेंद्रसिंहराजे आणि ना . देसाई यांचे भैरवनाथ बोट क्लब आणि ग्रामस्थांनी आभार मानले.