इमेज कॅलेंडर छायाचित्र स्पर्धेचा निकाल जाहीर, इमेज कॅलेंडरमध्ये अनुभवता येणार रायगडचा निसर्ग
प्रथम क्रमांक प्रथमेश घरत यांनी पटकाविला १२ छायाचित्रकारांच्या छायाचित्रांची निवड
अमूलकुमार जैन-अलिबाग
दिनदर्शिकेच्या विश्वात इमेज कॅलेंडरने आपले स्थान अढळ करण्याच्या दिशेने वाटचाल सुरु ठेवली आहे. दोन वर्षांच्या यशस्वी प्रसिद्धीनंतर तिसऱ्या वर्षीदेखील कॅलेंडर प्रकाशन करण्याच्या दिशेने अलिबागच्या छायाचित्रकारांच्या त्रिकुटाने वाटचाल केली आहे. यंदा कॅलेंडरच्या प्रत्येक पानावर निसर्ग चित्र , गड आणि किल्ल्यांचे छायाचित्र प्रसिद्ध करण्यात येणार आहे. यासाठी इमेज कॅलेंडर संस्थेने छायाचित्र स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेला जिल्ह्यातून शेकडो छायाचित्रकारांचा सहभाग लाभला होता.
प्रथम क्रमांक प्रथमेश घरत , द्वितीय क्रमांक भूषण गुरव , तृतीय क्रमांक अतुल मोरे , चतुर्थ क्रमांक प्रसाद पाटील , पाचवा क्रमांक सुरेश पाडावे , सहावा क्रमांक निलेश शिर्के , सातवा क्रमांक समीर भायदे , आठवा क्रमांक नितीन शेडगे , नववा क्रमांक अविनाश राऊत , दहावा क्रमांक संतोष पेरणे , अकरावा क्रमांक निलेश पाटील आणि बाराव्या क्रमांकासाठी शंतनू नाझरे यांच्या छायाचित्राची निवड करण्यात आली आहे.
स्पर्धेसाठी सादर करण्यात आलेल्या शेकडो छायाचित्रांमधून कॅलेंडरसाठीच्या बारा पानांसाठी निवड करणे जिकरीचे होते. यासाठी इमेज कॅलेंडर संस्थेने पुणे येथील ज्येष्ठ चित्रकार मुकुंद बहुलेकर यांची निवड केली होती. त्यांच्या परीक्षणानंतर बारा छायाचित्रणाची निवड करण्यात आली आहे. क्रमांकानुसार कॅलेंडरच्या पहिल्या पानावरुन छायाचित्रकारांची छायाचित्रे प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती इमेज कॅलेंडरचे जितू शिगवण , रमेश कांबळे आणि समीर मालोदे यांनी दिली आहे.