स्थानिक गुन्हे शाखा सातारची बेधडक कारवाई 94500 रुपयांच्या बनावट नोटा व देशी बनावटीची पिस्तूल बाळगणारी टोळी जेरबंद
कुलदीप मोहिते -कराड
दिनांक 11 11 2020 रोजी स्थानिक गुन्हे शाखा सातारा सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद सिंग साबळे यांना 3 इसम कोळेवाडी तालुका कराड जिल्हा सातारा येथील एमएसीबी येथील सब स्टेशन जवळ एकत्रित येणार असून त्यांच्याजवळ 2000 व 500 रुपयांच्या भारतीय चलनातील बनावट नोटा आहे अशी गोपनीय माहिती प्राप्त झाली होती त्यानुसार सातारचे पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल व अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांच्या आदेशानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा आनंद सिंग साबळे व त्यांच्या पथकाने वेशांतर करून कोळेवाडी एम ए सी बी सब स्टेशन जवळ सापळा रचला दरम्यान सब स्टेशन जवळ तिन्ही इसम संशयास्पद हालचाल करताना दिसून आले त्यांना हटकले असता ते पळून जात असताना पथकातील बीट अंमलदार यांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना पकडले त्यांची अंगझडती घेतली असता तिन्ही इसमांच्या ताब्यात हजार रुपये व पाचशे रुपये अशा 94 हजार 500
रुपयांच्या भारतीय चलनातील बनावट नोटा मिळाल्या तसेच एका इसमाच्या कमरेस एक बनावटी पिस्तुल आढळून आले त्यांच्यावर कराड शहर पोलीस स्टेशन गुन्हा नोंद झालेला आहे सदरची कारवाई ही सातारचे पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल व अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झाली व स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद सिंग साबळे यांच्या आधिपत्याखाली सहाय्यक फौजदार जोतिराम बर्गे अतिश घाडगे संजय शिर्के विजय कांबळे साबिर मुल्ला नितीश गोगावले मंगेश महाडिक प्रवीण फडतरे प्रमोद सावंत अमित सपकाळ विशाल पवार सचिन ससाने मयूर देशमुख विजय सावंत यांनी सदरची कारवाई केलेली आहे