"संवेदना चॅरिटेबल संस्था पनवेल " या संस्थेतर्फे आदिवासीपाड्यात दिवाळीचा फराळवाटप
अमृता कदम-
महाराष्ट्र मिरर टीम
यावर्षी संवेदना संस्थेतर्फे वाघाची वाडी , कोंडीची वाडी, डांगरपाडा या तीन पाड्यांवर फराळ वाटप करण्यात आला.
आपल्या बरोबरच वंचित घटकांनाही या दिवाळीचा आनंद मिळावा ही जाणीव असलेल्या "संवेदना सख्या" तसेच बाहेरचे काही हितचिंतकही आपला खारीचा वाटा यासाठी उचलत असतात.
स्वत:साठी, स्वत:च्या घरासाठी तर सर्वच करतात परंतू दुसरयाला दयायचे झाल्यास हात आखडता घेतात हे चित्र नेहमीच पाहावयास मिळते. परंतू महिलाराज असलेल्या या संस्थेची विशेष बाब ही आहे की, गेले आठ वर्ष सातत्याने सामाजिक जाणिंवाचे भान ठेऊन बरीच सामाजिक कामे संवेदना सख्या करत आहेत.
आणि "सारया जगाची चेतना - संवेदना" या संस्थेच्या टॅगलाईन प्रमाणेच संस्थेचे काम चालू आहे.
असे मत या प्रसंगी बोलताना संस्थेच्या अध्यक्षा सुनेत्रा गवाणकर यांनी यावेळी व्यक्त केले