भाजपा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस रविंद्रजी चव्हाण यांनी जिल्हा संपर्क कार्यालयास दिली सदिच्छा भेट
ओंकार रेळेकर-चिपळूण
चिपळूण तालुका अध्यक्ष विनोदभाई भोबस्कर यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.कार्यालयीन कामकाजाबाबत चर्चा विनिमय करून कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले. यावेळी प्रदेश चिटणीस प्रमोदजी जठार, जिल्हा अध्यक्ष डॉ विनयजी नातू, नगराध्यक्षा सौ. सुरेखाताई खेराडे, शहर अध्यक्ष आशिष खातू, जिल्हा कार्यकारिणी सदस्य दिपाशेठ देवळेकर, विजय चितळे, तालुका सरचिटणीस वसंत ताम्हणकर, शहर सरचिटणीस श्रीराम शिंदे, मधुकर निमकर, तालुका चिटणीस संदेश शेलार, नगरसेविका सौ. रसिका देवळेकर,सौ. नुपुर बाचीम, युवा मोर्चा प्रदेश पदाधिकारी प्रणय वाडकर, आत्मनिर्भर भारत जिल्हा संयोजक शार्दुल साडविलकर, महिला मोर्चा शहर अध्यक्षा सौ. अश्विनी ओतारी, युवा मोर्चा शहर अध्यक्ष सुयश पेठकर, अमित ओतारी उपस्थित होते.