मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर 26/11 सदृश परिस्थिती.
वाहनचालकांच्या निष्काळजी पणाची दहशत अनाकलनीय अपघाताला कारणीभूत.
शब्दांकन-गुरुनाथ रामचंद्र साटेलकर
या धडकेचा आवाज एवढा प्रचंड होता की जवळच असलेल्या देवदूत यंत्रणेच्या तळावरून सगळे जवान त्या ठिकाणी धावले. हाकेच्या अंतरावर असलेल्या महामार्ग पोलीसांच्या पळस्पे टॅपचे कर्मचारी देखील काही क्षणात मदतीला आले. आय आर बी पेट्रोलिंग, डेल्टा फोर्स आणि लोकमान्य हॉस्पिटलची ऍम्ब्युलन्स सेवा त्वरित उपलब्ध झाली. रेस्क्यू ऑपरेशन सुरू असताना रात्रीच्या अंधारात फक्त किंकाळ्या आणि विव्हळने ऐकू येत होत्या. सगळ्या यंत्रणांनी अत्यंत कसोशीचे प्रयत्न करून जखमींना लागलीच MGM हॉस्पिटल कामोठे येथे दाखल केले, त्यामुळे मोठी जीवित हानी आटोक्यात आली असली तरी, मृत्यूचे भय अजून घोंगावत आहे, आरोग्य यंत्रणा योग्य उपचार करत आहे. धडकेत एका प्रवाशाला मृत्यूने गाठले आहे आणि इतरांच्या जखमाही गंभीर स्वरूपाच्या आहेत.
26/11 आजचा हा दिवस त्या बसमधील प्रवाशांसाठी काळरात्र होती याची प्रचिती देऊन गेला.