गरजवंत विद्यार्थ्याला प्रसाद सावंत यांच्याकडून मदतीचा हातभार !
चंद्रकांत सुतार--माथेरान
लॉक डाऊन काळात सर्वत्र ऑनलाइन शिक्षण पद्धती सुरू असल्याने माथेरान मधील एका गरजवंत कुटुंबातील विद्यार्थ्याला माथेरान नगरपरिषदेचे गटनेते तथा बांधकाम सभापती प्रसाद सावंत यांनी येथील सोफिया यासील( मुन्ना ) शेख या विद्यार्थ्याला ऑनलाइन अभ्यासक्रमासाठी मोबाईल भेट देऊन सहकार्याची भूमिका पार पाडली आहे.
मागील आठ महिन्यांपासून लॉक डाऊनच्या काळात केवळ पर्यटनावर अवलंबून असणाऱ्या स्थानिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले होते.त्यातच शैक्षणिक पद्धती सुध्दा ऑनलाइन केल्यामुळे अत्यंत हलाखीची परिस्थिती असलेल्या सोफिया या विद्यार्थ्याच्या घरात मोबाईल नसल्यामुळे शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण करता येत नव्हता ही बाब येथील सामाजिक कार्यकर्ते अजमुद्दीन नालबंद यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी याबाबत माथेरान नगरपरिषदेचे गटनेते तथा बांधकाम सभापती प्रसाद सावंत यांना सांगितले त्यावरून ताबडतोब प्रसाद सावंत यांनी चांगल्या प्रतीचा एक मोबाईल सोफिया या विद्यार्थ्याच्या घरी जाऊन सुपूर्द केला आहे. यावेळी माजी बांधकाम सभापती शकील पटेल यांसह नगरसेवक नरेश काळे, अजमुद्दीन नालबंद, राजेश काळे, समीर पन्हाळकर, उमेश सावंत आदी उपस्थित होते. मागील काळात सुद्धा प्रसाद सावंत यांनी गरजवंत नागरिकांच्या मागणीनुसार जवळपास पंधरा मोबाईल भेट दिलेले आहेत.गरजवंत विद्यार्थ्यांना नेहमीच शैक्षणिक क्षेत्रात लागणारे साहित्य प्रसाद सावंत हे देत आहेत.त्यामुळेच त्यांच्या निस्वार्थी कार्यपद्धतीवर नागरीक समाधान व्यक्त करीत आहेत.