Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

सरकारी कर्मचा-यांचा २६ नोव्हेबरला लाक्षणिक संप ! संघटनेच्या वतीने मुरूड तहसिलदारांना निवेदन

 सरकारी कर्मचा-यांचा २६ नोव्हेबरला  लाक्षणिक संप !  संघटनेच्या वतीने मुरूड तहसिलदारांना निवेदन 

अमूलकुमार जैन-मुरुड

राज्य सरकारी कर्मचारी , शिक्षकांच्या देशव्यापी लाक्षणिक संपात तालुका राज्य सरकारी , निमसरकारी , जिल्हा परिषद कर्मचारी व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी हे गुरूवारी २६ नोव्हेंबर रोजी होणा-या लाक्षणिक संपात सहभागी होणार असुन या बाबतचे  निवेदन राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना  मुरूड तालुक्याच्या अध्यक्षा- रीमा कदम यांनी  मुरूड तहसिलदार गमन गावित यांना याबाबतच रितसर निवेदन देण्यात आले.

यावेळी अध्यक्ष रीमा कदम , सरचिटणीस वनिता पाटील, सदस्य -म्हात्रे मॅडम  ,कार्याध्यक्ष- संतोष पवार,  सदस्य -राजु भोये,  विकास बोंडले ,सुमित उजगरे,  विजय सूर्वासे,केतन भगत आदिसह कर्मचारी उपस्थित होते.

राज्य सरकारी कर्मचारी शिक्षकांसाठी अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाने गेल्या ६०वर्षापासुन केंद्र व राज्य पातळीवर सततचा लढा दिला आहे.त्यामुळेच देशातील २७ राज्यातील ८०लाख राज्य सरकारी कर्मचारी या महासंघाच्या छत्राखाली भक्कमपणे गेली सहा दशके एकसंघ राहिले आहेत. सर्वाना १९८२ ची जुनी पेंशन योजना लागु करा, खाजगीकरण , कंत्राटीकरण धोरण रद्द करून सध्याच्या अंशकालीन व कंत्राटी कर्मचा-यांच्या सेवा नियमित करा,   मुदतपुर्व सेवा , निवृर्तीचे  जाचक धोरण रद्द करा ,नवीन कामगार कायदे रद्द करा,

केंद्रीय कर्मचा-यांना देय ठरणारे सर्व भते राज्य सरकारी कर्मचा-यांना लागु करा , सर्व सहवर्गातील रिक्त पदे तात्काळ भरा  व ही  पदे भरताना अनुकंपा तत्वावरील  नियुक्ता विनाअट करा , प्रत्येक गरजु व्यक्तीला  मनरेगामार्फत किमान २००  दिवसांचा रोजगार मिळेल, असे धोरण लागु करा अशा विविध १३ मागण्यांकडे केंद्र व राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी २६ नोव्हेंबरला देशातील कामगार कर्मचारी शिक्षक देशव्यापी लाक्षणिक संपावर जाणार आहे.



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies