मायणी ते म्हासुर्णे (पंढरपूर - मल्हारपेठ) रस्त्याची प्रचंड दुरावस्था.
मिलींदा पवार -खटाव सातारा
रस्ते विकास महामंडळ, पीड्बल्युडी, स्थानिक प्रशासन या दुरावस्था कडे लक्ष कधी देणार? रस्त्याचे टेंडर निघण्यासाठी एवढा वेळ का लागतोय? या रस्त्यावर प्रचंड अवजड वाहणे, तसेच ऊसाचे ट्रक, ट्रॅक्टर ट्रॉली यांची वाहतुक करणारी वाहणे औंध, रायगाव, गोपुज, पडळ, उदगिरी, व सह्याद्री साखर कारखाना येथे ऊसाची वाहतुक होत असते. या बिकट परिस्थितीतुन वाहणे चालवणे जिकीरीचे तरी आहेच पण धोकादायकही आहे. तरी या महत्त्वपूर्ण रस्त्याचे काम लवकरात लवकर कसे चालु होईल याकडे लक्ष द्यावे ही या परिसरातील जनतेची मागणी आहे.