म्हसळा नगरपंचायतीवर महिला काँग्रेसने काढला हंडा-बांगडी मोर्चा:नगरपंचायतीला छावणीचा स्वरूप
अरुण जंगम-म्हसळा
म्हसळा नगरपंचायत हद्दीतील वॉर्ड क्र. ९ व १४ मधील पाणी समस्यांवरून मंगळवारी महिला कॉग्रेसने मुख्याधिकारी यांना जाब विचारण्यासाठी हंडा-बांगडी मोर्चा काढला.मात्र पोलिसांचा चोख बंदोबस्त असल्याने या महिलाना हंडा व बांगडी नगरपंचायतमध्ये नेता आले नाही.
काँग्रेसच्या महिला शहर अध्यक्षा नाजिमा मुकादम व युवती अध्यक्षा आरती पेडणेकर या २६ ऑक्टोंबर रोजी वॉर्ड क्र.९ येथे असणार्या साठवण टाकी मध्ये जनावरांची पडणारी विष्टा व वॉर्ड क्र.१४ मध्ये भेडसावणारी पाणी समस्या यावरून म्हसळा तहसील कार्यालयाच्या आवारात आमरण उपोषणाला बसले होते.मुख्याधिकारी मनोज उकिर्डे यांनी नगरपंचायत हद्दीतील वॉर्ड क्र.९ व १४ या भागातील समस्या ७ दिवसात सोडवण्याचे लेखी आश्वासन दिल्या नंतर हे उपोषण मागे घेण्यात आले होते.मात्र मुख्याधिकारी यांनी लेखी आश्वासन दिल्या नंतर देखी अद्याप या समस्या जैसेथे असल्याने मंगळवारी काँग्रेसच्या महिला शहर अध्यक्षा नाजिमा मुकादम,युवती अध्यक्षा आरती पेडणेकर व वॉर्ड मधील महिलांनी मुख्याधिकारी यांना हंडा व बांगडी देण्यासाठी मोर्चा काढला.शहरात १४४ कलम लागू असल्याने या मोर्चा साठी पोलिसांकडून पाच जणांनाच नगरपंचायत मध्ये जाण्याची परवानगी देण्यात आली होती.
म्हसळा नगर पंचायत म्हसळा गाव चलव्ह्या साठी सक्षम नाही.
ReplyDelete