खटाव राष्ट्रवादी युवक काँग्रेस कार्यकारणीसाठी तरुणांची मोठया प्रमाणात गर्दी!
मिलिंदा पवार - खटाव
खटाव तालुका राष्ट्रवादी युवकच्या कार्यकारीणीकरीता मुलाखती घेण्यात आल्या.यावेळी सातारा जिल्हा प्रभारी संकल्प डोळस , युवकचे प्रदेश सरचिटणिस गोरखनाथ नलवडे, प्रभाकर देशमुख, मा. सभापती संदिप मांडवे , प्रा बंडा गोडसे, कविताताई म्हैत्रे ,इतर पदाधिकारी व युवक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आणि अजित पवार यांच्या विचारांवर विश्वास ठेवत खटाव तालुक्यातील युवक मोठ्या प्रमाणावर उपस्थित आहेत हे चित्र अतिशय आशादायी आणि सुखावणारे आहे. खटाव तालुक्यातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या मुलाखतीकरीता युवकांची मोठ्या प्रमाणात असणारी उपलब्धता ही आगामी काळातील बदलाची नांदी असेल.असं यावेळी प्रमुख पदाधिकाऱ्यांचे म्हणणं होतं.