पदवीधरांचे प्रश्न सोडवण्यासाठी महेश म्हस्के यांचा निवडणूक जिंकण्याचा निर्धार
तरोनिश मेहता-पुणे
पदवीधर मतदारसंघाची निवडणूक ही पदवीधरांच्या कल्याणासाठी असून यामध्ये पक्षीय राजकारणाचा संबंध नाही. पदवीधरांसाठी विधायक कामे करता यावी, त्यांना विविध शासकिय योजनांचा लाभ मिळावा याकरिता निवडणूक लढवत आहे. सर्वसाधारण तरुणांना राजकारणात संधी मिळावी, त्यांचे भविष्य उज्ज्वल घडवण्यासाठी, शैक्षणीक धोरणात अमुलाग्र बदल घडवण्याची गरज आहे, यासाठी एक संधी बिगर राजकिय वारसा असलेल्या उमेदवाराला मिळण्याची आवश्यकता असल्याचे महेश म्हस्के म्हणाले.