Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

कोरेगाव येथील जरंडेश्वर साखर कारखान्यात बॉयलरचा स्फोट एक जण ठार तर सहा कामगार जखमी*

 कोरेगाव येथील जरंडेश्वर साखर कारखान्यात बॉयलरचा स्फोट एक जण ठार तर सहा कामगार जखमी 

प्रतिक मिसाळ- कोरेगाव


 साताऱ्यातील कोरेगाव तालुक्यातील चिमणगाव येथील जंरडेश्वर साखर कारखान्यात ( Jarandeshwar Sugar Factory ) बॉयलरचा भीषण स्फोट झाला स्फोट इतका भयंकर होता की , यात एका कामगाराचा होरपळून मृत्यू झाला तर सहा कामगार गंभीर जखमी झाले आहेत . संभाजी घोरपडे असं मृत कामगाराचं नाव आहे . जखमी कामगारांवर उपचार सुरू आहेत . जरंडेश्वर साखर कारखान्यात रात्री 10 वाजेच्या सुमारात बॉयलर फुटून भीषण स्फोट झाला स्फोटात एका कामगाराचा जागीच मृत्यू झाला आहे . तर सहा कामगार गंभीर जखमी झाले आहेत . जखमी झालेल्या सहा कामगारांवर कोरेगाव येथील खासगी रुग्णायालय उपचार सुरु आहेत . या स्फोटामुळे कारखान्याच्या परिसरातील चार किमीचा परिसर हादरुन गेला होता बॉयलिंग हाऊसचे स्टीम उघडल्याने हा स्फोट झाल्याची माहिती जखमी कामगारांनी पोलिसांना दिली . या घटनेचा कोरेगाव पोलीस पंचनामा करत आहेत या घटनेची नोंद कोरेगाव पोलीस स्टेशनमध्ये अद्याप करण्यात आली नसून पोलीस पुढील तपास करीत आहेत . दरम्यान , जरंडेश्वर शुगर मिल्सच्या केनयार्डमध्ये अपघाताची कमी नाही . गेल्या काही दिवसांपूर्वी ऊस खाली उतरवत असताना ट्रॉलीवरून पडल्यानं एका ट्रॅक्टर चालकाचा मृत्यू झाला होता . दशरथ त्र्यंबक जाधव ( वय -36 , रा . तळिये ) असं मृत चालकाचं नाव होतं.दशरथ त्र्यंबक जाधव हे तळिये येथील श्रीकांत शिवाजीराव चव्हाण यांच्या ट्रॅक्टरवर ( एमएच - 11 - जी -4396 ) चालक म्हणून काम करत होते . चव्हाण यांचा ट्रॅक्टर व ट्रॉली जरंडेश्वर शुगर मिल्ससाठी ऊस वाहतूक करत आहे.कारखान्याच्या केनयार्डमध्ये हा ट्रॅक्टर ऊस उतरवण्यासाठी गेला होता . त्यावेळी जाधव हे ट्रॉलीवर चढले . तेथून खाली पडल्याने ते जखमी झाले त्यांनी कारखान्याच्या वाहनातून जाधव यांना कोरेगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेले . मात्र , तेथे डॉक्टरांनी जाधव यांना मृत घोषित केलं .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies