आमदार, खासदार यांची डोके दुखी वाढली. तासगाव तालुक्यातील 39 ग्रामपंचायतीमध्ये 400 अर्ज दाखल..आज शेवट दिवस; अर्ज ऑफलाइन स्वीकारणार
राजू थोरात- तासगाव
कोरोना पार्श्वभूमीवर राज्यातील ग्रामपंचायती पुढे ढकलण्यात आल्या होत्या. कोरोना कमी झाल्यानंतर राज्यातील ग्रामपंचायती निवडणुकीला निवडणूक आयोगाने परवानगी दिली. तासगाव तालुक्यामध्ये 39 ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागल्या आहेत. महा ई-सेवा सेतू केंद्रात ,नेट कॅफे मध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्यासाठी तासगाव शहरात व तालुक्यात गर्दी होत आहे.दी 28 रोजी नेट नसल्यामुळे ऑनलाइन प्रक्रिया पूर्णपणे ठप्प झाली होती.
तो पर्यत राज्यसरकारने आदेश जारी केले.आज दी 30 पर्यत ऑफलाइन अर्ज स्वीकारणार त्यांची वेळ 5-30 ठेवली आहे.
दी 28 सोमवार या दिवशी एकूण 84 अर्ज दाखल झालेले होते.
तर दी 29 रोजी 400 अर्ज दाखल झाले आहेत अशी माहिती निवडणूक नियंत्रण अधिकारी तथा तहसीलदार कल्पना ढवळे यांनी माहिती दिली.
ढ़वळी 3,हातनोली 9 ,जुळेवाडी 6, कवठेएकंद 50, विसापूर 5, येळावी 19, धोंडेवाडी 7, धुळगाव 11, हातनुर 24, मांजर्डे 48, पाडळी 4, गव्हाण 19, जरंडी 14, पेड 25, सावळज 28, वाघापूर 1, वडगाव 6
कवठे एकंद 50, धामनी 7,निंबळक6,राजापुर14,शिरगाव5, तुरची 11, येळावी 19, डोरली 2, गोटेवाडी 26, दहिवडी 4, गौरगाव 11,लोकरेवाडी 5, सिद्धेवाडी 6, वज्रचौंडे 2, यमगरवाडी 16 ह्या गावातून 400 अर्ज दाखल झालेले आहेत.
39 ग्रामपंचायती पैकी 23 ग्रामपंचायती ह्या भाजपकडे आहेत तर राष्ट्रवादीकड़े 16 ग्रामपंचायती आहेत.
भाजप राष्ट्रवादी शिवसेना या पक्षातच खरी लढत होणार आहे.त्यामध्ये अपक्ष उमेदवारही खुप आहेत.
काँग्रेस पक्षात शांतता आहे बोटावर मोजण्याइतपत 39 गावांमध्ये मोजकीच उमेदवार असतील.भाजप खासदार सजंयकाका पाटील यांचे होमपिच तासगांव असल्याने शिवसेनेने जोरदार फिल्डिंग लावली आहे. 39 गावामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नेत्यांच्यावर आमदार सुमनताई आर पाटील यांनी जबाबदारी दिली आहे.
काट्याच्या लढती कवठेएकंद, विसापूर, येळावी, हातनुर, मांजर्डे, राजापूर वज्रचौंडे,या गावात होणार आहेत.
या निवडणुकीबाबत खासदार संजय काका पाटील व आमदार सुमनताई आर पाटील हे प्रसारमाध्यमांशी कोणताही शब्द बोलत नाहीत. त्यामुळे उमेदवार व कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे .तर शिवसेनेकडून तासगाव कार्यालयांमधून सर्व सूत्रे हाताळत आहेत.काँग्रेस पक्षात शांतता आहे. काल अर्ज भरण्यासाठी तहसील कार्यालयामध्ये गर्दी पहावयास मिळाली.तर आज शेवटचा दिवस असल्याने इच्छुकांची गर्दी खूप होणार आहे. काही उमेदवारांची कागदपत्रे गोळा करताना दमछाक होत आहे. तर काही गावात आरक्षण लागले आहे त्या ठिकाणी उमेदवार मिळेना. उमेदवार मिळाला तर त्याच्याकडे निवडणुकीसाठी पैसा खर्च करण्यासाठी नाही. त्यामुळे स्थानिक नेत्यांना मोठे कोडे पडले आहे.
निवडणुकीत खर्च करायचा कोणी स्थानिक नेते बुचकुळ्यात
39 ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक खर्च करायचा कोणी ह्या वर नेत्यांनी हात वर केल्यामुळे स्थानिक नेते बुचकुळ्यात पडले आहेत. कागदपत्रे व उमेदवार शोधा शोधी करेपर्यंत स्थानिक नेत्यांना खर्च करावा लागत आहे.