नरभक्षक बिबट्याचा उपद्रव वाढला,आज सकाळी 11 वाजता 9 वर्षांच्या मुलीवर केला हल्ला, बिबट्याच्या हल्ल्यात तिलाही गमवावा लागला जीव ,या बिबट्याच्या हल्ल्यात आतापर्यंत 11 जणांना गमवावा जीव
महाराष्ट्र मिरर टीम-सोलापूर
बीड आणि मोहोळ वन परिक्षेत्रातील एकूण दहा शेतकामगारांवर हल्ला करून ठार करणारा हा बिबटया नरभक्षक झाला असून आज सकाळी 11 ऊस तोड करणाऱ्या कामगाराच्या 9 वर्षाच्या मुलीला शेतातून ओढून नेऊन तिच्यावर हल्ला केला या हल्ल्यात या मुलीची प्रकृती चिंताजनक असल्याचे कळतंय.हे वृत्त प्रसिद्ध करेपर्यंत या मुलीला करमळ्यातील कुटीर रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले आहे.आता पर्यंत या बिबट्याने या परिसरातील 11 जण ठार केले आहेत.
फुलाबाई अरचंद कोटली राहणार दुसाने तालुका साक्री जिल्हा नंदुरबार वय वर्षे 9 या ऊस तोडणी कामगार कुटुंबातील मुलीचा नरभक्षक बिबट्याने दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास हल्ला करून ठार केले आहे ही घटना जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र बारकुंड यांच्या शेतात घडली त्यांच्या शेतात आज ऊस तोडणी सुरू होती बाजूलाच ऊस तोडणी कामगारांची मुले खेळत होती अशातच नरभक्षक बिबट्याने त्या निष्पाप मुलीवर हल्ला केला यानंतर ऊस तोडणी कामगारांनी त्याने त्याचा पाठलाग केला व त्याला हुसकावून लावले जखमी मुलीला करमाळा कुटीर रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले आहे
दरम्यान या नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याचे आदेश वन विभागाने दिले असले तरी त्याला गोळ्या घालण्यासाठी शार्प शूटर दाखल झाले आहेत.