तासगाव तालुक्यातींल 39 ग्रामपंचायत भाजप खासदार सजंयकाका पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ताकदीने लढवणार- भाजप नेते सचिन पाटील
राजू थोरात तासगांव
सांगली जिल्ह्याचे भाजप खासदार संजयकाका पाटील यांचे होम पिच म्हणजे त्यांचे गाव तासगांव तालुक्यातील चिंचणी आहे.तर राष्ट्रवादी आमदार सुमनताई आर पाटील यांचे होम पिच म्हणजे त्यांचे गाव तासगांव तालुक्यातील अंजनी आहे.
तालुक्यात शिवसेनेची ताकदही वाढली आहे.तासगाव तालुक्यात 39 ग्रामपंचायत निवडणूक रणधुमाळी सुरू झाली आहे.
सुरवातीच्या काळाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने स्वबळाचा नारा दिल्यानंतर तालुक्यातील शिवसेना व काँग्रेस नाराज झाली त्यानंतर शिवसेना व काँग्रेस यांनीही स्वबळाचा नारा दिला.याचा अर्थ असा की खेड्यांमध्ये महा विकास आघाडी होणार नाही हे स्पष्ट झाल आहे.
त्यानंतर आता भाजपचे नेते सचिन पाटील यांनी खासदार संजय काका पाटील यांच्या कार्यालयांमध्ये पत्रकार परिषद घेतली होती. सचिन पाटील यांनी सांगितले की खासदार संजय काका पाटील यांनी तासगाव तालुक्याचा विकास केला आहे पाणी योजना पूर्णत्वास नेल्या आहेत. भाजपच्या नेतृत्वाखाली व खासदार संजय काका पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली 39 ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा फडकवनार असे सांगितले.
. 23 तारखेपासून ते 30 तारखेपर्यत अर्ज भरणे मुदत आहे.