...... या ठिकाणी 'बुरेवी' चक्रीवादळाचा जोरदार फटका: हवामान शास्त्रज्ञ प्रा किरणकुमार जोहरे
'बुरेवी' नंतर लवकरच 'तौक्ते' ही येणार!
महाराष्ट्र मिरर टीम-मुंबई
यावर्षी आलेल्या 'अॅम्फन' आणि 'निसर्ग' या पहिल्या दोन चक्रीवादळांचा वेध घेण्यासाठी दिल्ली येथे एक उच्चस्तरीय तीन सदस्यीय कमिटी गठीत करण्यात आली. हवामान संशोधनातील उल्लेखनीय योगदानाची वरीष्ठ पातळीवर दखल घेत प्रा किरणकुमार जोहरे यांची त्यात अनौपचारिक निवड करण्यात आली आहे. चक्रीवादळांचा अचूक वेध घेण्यासाठी ते दिवसातील २२ तास काम करत भारत व जागतिक हवामानातील घटनांवर लक्ष ठेऊन निरीक्षण घेत असतात.
चक्रीवादळांचे विज्ञान!
हवामान खात्याचा अधिकृत मान्सून १ जूनला सुरू होऊन ३० सप्टेंबरला दफ्तरी संपतो. १५ आॅगस्ट २०२० ला महाराष्ट्रात मान्सून खऱ्या अर्थाने सुरू झाला व चार महिन्यानंतर म्हणजे १५ डिसेंबर २०२० ला तो संपेल असे आपले वैयक्तिक शास्त्रीय निरीक्षण आहे असे ही हवामान तज्ज्ञ प्रा किरणकुमार जोहरे म्हणाले.
जेव्हा वातावरणात अस्थिरता निर्माण होते आणि वारे गोलाकार फिरु लागतात तेव्हा हवेत भवरे तयार होऊन चक्रीवादळ बनते. मान्सून परतत आहे याचे हे एक दर्शक परीणाम आहे. चक्रीवादळे ही दर्शक म्हणून देखील काम करतात. मान्सून पुर्व काळात आणि मान्सून संपतांना वातावरणातील अस्थिरतेने चक्रीवादळांची निर्मिती होते. आॅक्टोबर व नोव्हेंबर मध्ये मान्सून परतण्यासाठी सुरुवात झाली आहे हे दर्शवितात असे ही ते म्हणाले.
मान्सून आणि चक्रीवादळांचा पॅटर्न बदलला!
सध्या मान्सून परतण्यास सुरुवात झाली आहे. मान्सून परतीचे ईशान्य मोसमी वारे आता वाहू लागले आहेत याचा परीणाम म्हणून आता चक्रीवादळे निर्माण होण्याची सुरुवात झाली आहे. मान्सून परतत असतांना २०२० या वर्षी तयार झालेले 'निरव' हे पहिले चक्रीवादळ उठले होते. येत्या काळात अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरात अजून चक्रीवादळे निर्माण होतील. यानंतर देखील डिसेंबर २०२० आणि जानेवारी २०२१ मध्ये चक्रीवादळे आणि त्यामुळे ठराविक कालावधीच्या पावसाचा आपल्याला अनुभव घ्यावा लागेल असा इशारा देखील त्यांनी दिला.
दरवर्षी आॅक्टोबर व नोव्हेंबर मध्ये चक्रीवादळे निर्माण होतात. यावर्षी एकही चक्रीवादळ आॅक्टोबर मध्ये निर्माण झालेले नाही. नोव्हेंबरच्या शेवटी 'निवर' हे चक्रीवादळ बनले. अर्थात याचा सरळ सरळ नैसर्गिक अर्थ असा निघतो कि डिसेंबर आणि जानेवारी मध्ये अजून वादळांना आपल्याला सामोरे जायचे आहे. तसेच गेल्या किमान २० वर्षापासून मान्सून पॅटर्न बरोबरच चक्रीवादळांचा पॅटर्न देखील बदलला लक्षणीयरित्या चित्र बदलला आहे असे आपले निरपेक्ष वैज्ञानिक निष्कर्ष मांडतांना भौतिकशास्त्रज्ञ प्रा किरणकुमार जोहरे म्हणाले. या बद्द्ल त्यांनी वारंवार भारत सरकारला कळविले आहे.
'बुरेवी' नंतर 'तौत्के'!
'बुरेवी' या चक्रीवादळांनंतर साधारणतः पुढील दोन आठवड्यात पुन्हा नवीन दुसरे चक्रीवादळ तयार होईल. 'तौत्के' या म्यानमारने ठेवलेले नावाने ते ओळखले जाईल. हे चक्रीवादळ अरबी समुद्रात निर्माण होईल की बंगालच्या उपसागरात याबाबत हवामान तज्ज्ञ प्रा किरणकुमार जोहरे सध्या सखोल अभ्यास करीत आहेत.
'अंदाज नव्हे माहिती!'
एक ही शेतकरी आत्महत्या होऊ नये या ध्येयाने व आत्मनिर्भर भारतासाठी हवामानाची माहितीने शेतीद्वारे निर्यात वाढवत 'अर्थव्यवस्थेला बुस्टरडोस' देण्यासाठी प्रा किरणकुमार जोहरे कार्यरत आहेत. गेल्या दहा वर्षापेक्षा अधिक काळापासून सुरू विना अनुदानित असलेल्या 'अंदाज नव्हे माहिती!' या प्रा किरणकुमार जोहरे यांच्या २४ बाय ७ शेतकर्यांना पुरवल्या जाणार्या सेवेचा महाराष्ट्र व भारतातील इतर राज्यांतील लाखो शेतकरी विना मोबदला लाभ घेतात.
प्रा किरणकुमार जोहरे हे केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेल्या इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ ट्राॅपीकल मेटीओराॅजी (आयआयटिएम) पुणेचे माजी शास्त्रज्ञ असून तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर वादळांबाबत रिसर्च पेपर देखील त्यांनी प्रकाशित केले आहेत.
चक्रीवादळाच्या दरम्यान वाढणारा पाऊस आणि करावयाच्या उपाययोजना याबाबत देखील त्यांनी सरकारला मार्गदर्शन तसेच सर्वसामान्य जनतेची भिती दूर करण्यासाठी ते सातत्याने जनजागृती करीत आले आहेत.
शेतकरी हीच प्रा किरणकुमार जोहरे यांची ताकद
'निसर्ग' चक्रीवादळ अलीबाग येथे धडकून अवघ्या दिड तासात नष्ट झाले असतांना देखील विविध टिव्ही चॅनल्सवरून खोटी हवामानाची माहिती देत मुंबईसह उत्तर महाराष्ट्रात काही 'अधिकृत' हवामान शास्त्रज्ञ घबराट निर्माण होईल असा प्रयत्न करीत होते.
अशावेळी प्रा किरणकुमार जोहरे यांनी वैज्ञानिक माहिती देत एक व्हिडीओ रेकॉर्ड करून सोशल मीडिया द्वारे शेअर केला. परीणामी महाराष्ट्रात शेतकर्यांनी तो 'वादळी' वेगाने व्हायरल केला. नागरीकांची भिती दूर झाली व शेतकऱ्यांना फार मोठा आधार मिळाला. परीणामी सकारात्मक विचाराने कृषी अर्थव्यवस्था सुधारणा करण्यासाठी प्रा किरणकुमार जोहरे यांच्या जनजागृती कार्याला हातभार लावण्यासाठी अचूक हवामान माहितीचे संदेश जास्तीत जास्त' शेअर' करुन हातभार लावतात. शेतकरी हीच प्रा किरणकुमार जोहरे यांची खरी ताकद बनले आहेत.
शेतकर्यांनी उगीच घाबरुन जाऊ नये!
बंगालच्या उपसागरात श्रीलंकेजवळ तयार झालेले हे चक्रीवादळ तमिळनाडूच्या किनारपट्टीवर दक्षिणेकडे धडकण्याची शक्यता अधिक आहे. यामुळे तमिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश, कर्नाटक व तेलंगणा या राज्यात निश्चितपणे पाऊस होईल.
महाराष्ट्र या चक्रीवादळा पासून एक हजार तीनशे किलोमीटर पेक्षाही जास्त अंतरावर असल्याने तुरळक प्रमाणात पाऊसा व्यतिरिक्त महाराष्ट्रातील शेतीला 'बुरेवी' चक्रीवादळांचा सध्या तरी कुठलाही धोका नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी मुळीच घाबरु नये असे आवाहन देखील प्रा किरणकुमार जोहरे यांनी केले आहे.
प्रा किरणकुमार जोहरे यांच्याशी संपर्कासाठी माहिती पुढीलप्रमाणे:
प्रा किरणकुमार जोहरे
भौतिकशास्त्रज्ञ व हवामान तज्ज्ञ
संपर्क ९१६८९८१९३९
प्रा किरणकुमार जोहरे
भौतिकशास्त्रज्ञ व हवामान तज्ज्ञ
संपर्क ९१६८९८१९३९