म्हसळ्याच्या तरुणाचा मोटारसायकलवर अभिनव प्रयोग
मोटारसायकल चालणार विजेसह सोलर ऊर्जेवर
अरुण जंगम-
महाराष्ट्र मिरर टीम म्हसळा
मॅकेनिक इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षाला शिकणाऱ्या आदेश लोदी(तुरंबाडी ता.म्हसळा)या तरुणाने मोटारसायकलवर एक अभिनव प्रयोग केला असून मोटारसायकल 2 तासात बॅटरी चार्ज केल्यास ती 50 ते 60 किमी अंतर कापणार आहे,आता तुम्ही म्हणाल यात काय विशेष,विजेवर चालणाऱ्या मोटारसायकल बाजारात उपलब्ध आहेत.पण जरा ऐका तर!,या पठयाने इलेक्ट्रिक मोटारसायकल वर सोलर पॅनल बसवलाय.मोटारसायकलची बॅटरी सोलरवरही चार्ज होणार आहे.मग आहे न गंमत!!
https://youtu.be/FjbTTw-7_DE
लॉकडाऊन काळात अनेकांनी अनेक प्रयोग केले,कोणाचे प्रयोग यशस्वी झाले तर कोणाचे फसले.मात्र आदेश लादीचा प्रयोग यशस्वी झाला आणि त्याचे प्रात्यक्षिक आज त्याने म्हसळा तहसील कार्यालयाजवळ उपस्थितांना दाखवलं.ही मोटारसायकल इंधन विरहीत अर्थात पेट्रोल डिझेल काहीही नसणार,त्याच्या या प्रयोगाचे रायगड जिल्ह्यात सर्वत्र कौतुक होत आहे.