Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

आवश्यक उपाययोजना करण्याच्या अधीन राहून जंजिरा किल्ला पर्यटकांसाठी खुला

आवश्यक उपाययोजना करण्याच्या अधीन राहून जंजिरा किल्ला पर्यटकांसाठी खुला

अमूलकुमार जैन-मुरुड



कोविड-19 विषाणूचा प्रादूर्भाव व संक्रमण रोखण्याच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्हा प्रशासनाने मुरुड तालुक्यातील जंजिरा किल्ल्यावर दि 25 डिसेंबर 2020 ते दि. 02 जानेवारी 2021 या कालावधीत पर्यटकांच्या प्रवेशास मनाई असल्याचे आदेश जारी केले होते. 

जिल्हाधिकारी रायगड तथा अध्यक्ष,जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण , रायगड श्रीमती निधी चौधरी यांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 25 व 30 तसेच महाराष्ट्र कोविड -19 उपाययोजना नियम 2020 मधील नियम 10 अन्वये प्राप्त अधिकारानुसार कोविड-19 विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना काटेकोरपणे करण्याच्या अधीन राहून जंजिरा किल्ला पर्यटकांसाठी खुला करण्याचे आदेश जारी केले आहेत.तसेच एका दिवसात चारशेपेक्षा अधिक पर्यटक मुरुड-जंजिरा किल्ल्यास भेट देणार नाहीत, तिकीट घेताना व बोटीत बसताना गर्दी होणार नाही, याबाबतचे पोलीस विभाग व स्थानिक प्रशासनाने योग्य ते नियोजन करण्याची दक्षता घ्यावी,असेही निर्देश पोलीस विभाग व स्थानिक प्रशासनाला दिले आहेत. 

      मुरुड जंजिरा किल्ला पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना किल्ल्यावर घेवून जाणे व किल्ल्याविषयी माहिती सांगणे तसेच पर्यटकांना राहण्याची सोय करणे, हा येथील पर्यटन व्यावसायिकांचा उदरनिर्वाहाचा एकमेव पर्याय आहे. पर्यटक येणार असल्याने पर्यटन व्यावसायिकांनी आधीपासूनच पर्यटकांकडून आगाऊ रक्कम स्विकारली असून, ही रक्कम पूर्वतयारीकरिता खर्च झाली असल्याने व हा किल्ला पर्यटनासाठी खुला न केल्यास सर्व व्यावसायिकांवर आर्थिक संकट येण्याची शक्यता आहे. सध्या ख्रिसमस सण सुरू असल्याने करोना विषाणूच्या अनुषंगाने योग्य त्या उपाययोजना करून हा किल्ला पर्यटकांसाठी खुला करण्यासंदर्भात सर्शत परवानगी देण्याबाबत अब्दुल रऊप सिद्दीकी व इतर यांच्या शिष्टमंडळाने मुरुड किल्ला पर्यटकांसाठी खुला करण्यासाठी प्रशासनाला विनंती केली होती. 

     प्रभारी अधिकारी, मुरुड पोलीस ठाणे यांनी ग्रुप ग्रामपंचायत राजापुरी , ता.मुरूड व जंजिरा पर्यटन संस्था मर्या., मुरुड यांनी मुरुड परिसरातील लोकांची उपजीविका पर्यटनावर असून जंजिरा किल्ला बंद केल्यामुळे आमची उपासमारीची वेळ येईल, आम्ही कोविडच्या अनुषंगाने सर्व नियमांचे पालन करून व योग्य तो खबरदारी घेवून व्यवसाय करण्यास तयार आहोत, तरी जंजिरा किल्ला पर्यटनासाठी खुला करण्यात यावा, अशी विनंती येथील स्थानिकांनी निवेदनाद्वारे प्रशासनाला केली आहे तसेच जंजिरा किल्ला पर्यटकांसाठी खुला न केल्यास तेथील जनता आंदोलन करण्याची शक्यता आहे, असेही कळविले होते. 

      या वस्तुस्थितीचा विचार करुन रायगड पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी करोनाच्या पार्श्वभूमीवर पर्यटक व बोटचालक / मालक यांनी मास्क लावणे , फिजिकल डिस्टंन्सिंगचे पालन करणे, बोटीमध्ये मर्यादेपेक्षा कमी पर्यटक नेणे, स्थानिक पोलीस , ग्रामस्थ व त्यांचे स्वंयसेवक यांच्या मदतीने पर्यटकांच्या रांगा लावणे, जंजिरा किल्ल्यामध्ये एका वेळी मर्यादेपेक्षा कमी पर्यटक सोडणे तसेच अपघात होणार नाही, याची खबरदारी घेणे इत्यादी उपायोजना करण्यात येणार आहेत, या बाबींची खात्री करुन तसेच पर्यटकांचा व त्यावर अवलंबून असलेल्या स्थानिक व्यावसायिकांचा, कायदा व सुव्यवस्थेचा विचार करुन मुरुड-जंजिरा किल्ला पर्यटकांसाठी खुला करण्यात यावा, तेथे योग्य तो पोलीस बंदोबस्त नेमण्यात येईल, अशी शिफारस जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी  कोविड-19 विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना काटेकोरपणे करण्याच्या अधीन राहून जंजिरा किल्ला पर्यटकांसाठी खुला करण्याचे आदेश जारी केले आहेत.  


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies