कर्तव्यदक्ष आणि कार्यतत्पर मंत्री शंभूराज देसाई
मिलिंद लोहार- सातारा
सातारा येथील जुन्या आरटीओ चौकात एसटी आणि वॅगन आर कारचा अपघात झाला,त्याच वेळी गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांचा गाड्यांचा ताफा त्याच मार्गावरून जात होता.
अपघात पाहून मंत्री देसाई यांनी गाड्यांचा ताफा थांबवला, गाडीतून खाली उतरत मंत्री देसाई यांनी प्रथम जखमींची चौकशी केली. अपघातातील महिला अतिशय भेदरलेली होती, तिच्या समवेत एक लहान मुलही होते.
मंत्री देसाई यांनी प्रथम जखमी महिलेची आस्थेवाईकपणे चौकशी केली. लहान मुलाला उचलून घेतले, आणि तेथिल अधिकाऱ्यांना तात्काळ जखमींना हॉस्पीटल मध्ये नेण्याच्या सुचना केल्या.मंत्री देसाई यांनी जखमींसाठी पाणी आणण्याच्या सूचना केल्या.त्याच वेळी अपघातग्रस्त एसटीच्या चालकासही शंभूराज देसाई यांनी चांगलेच सुनावले.
मंत्री देसाई यांनी या वेळीं दाखविलेली माणुसकी उपस्थित अनेकांना भावली. या वेळी त्यांच्यातील माणूसपनाचेही दर्शन घडले,मंत्रीपणाचा डामदौल बाजूला ठेऊन देसाईं यांनी गाडीतून खाली उतरून अपघातग्रस्तांना केलेली मदत खऱ्या अर्थाने, त्यानी लोकनेत्यांचा वारसा जपला असेच म्हणावे लागेल.