पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन संपन्न
रविंद्र कुवेसकर-उतेखोल/माणगांव
नगरपंचायत इमारतीच्या नूतनीकरणाच्या कामाचे उदघाटन ही त्यांनी केले. प्रत्येक वार्डात आदिती तटकरे यांचे आगमन होताच फटाक्याच्या गजरात दणक्यात त्यांचे स्वागत करण्यात आले.
आता नगरपंचायतच्या १ ते १७ प्रभागात एकुण ४ कोटी १३ लाख ८० हजार ७१५ मात्र रक्कमेच्या विकास कामांना सुरुवात होणार आहे. माणगांववर तटकरे कुटुंबाचे नितांत प्रेम आहे. माणगांवकरांच्या मुलभूत व सर्वांगीण विकासासाठी तटकरे कुटुंबीय नेहमीच कटिबद्ध आहे. माणगांव शहराला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी पालकमंत्री म्हणून मी स्वतः व खा. सुनील तटकरे यांच्या माध्यमातून जास्तित जास्त प्रयत्नशील आहोत. असे यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले.
याप्रसंगी माणगांव नगर पंचायत महिला बाल कल्याण समितीच्या माध्यमातून २० मुलींच्या संगणक प्रशिक्षणा-करिता धनादेशही त्यांच्या हस्ते सुपूर्त करण्यात आले. या कार्यक्रमासाठी माणगांव नगर पंचायत नगराध्यक्षा योगीता चव्हाण, उपनगराध्यक्ष दिलीप जाधव, तहसीलदार ललिता बाबर, माजी नगराध्यक्ष आनंद यादव, शहर अध्यक्ष महामुद धुंदवारे, राष्ट्रवादीचे सर्व नगरसेवक व नगरसेविका तसेच राष्ट्रवादीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांसह त्या त्या प्रभागातील नागरिक उपस्थित होते.