Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

धुकं नाही धूर आसमंतात सायंकाळी धुरकं लोक हैराण

 धुकं नाही धूर आसमंतात सायंकाळी धुरकं लोक हैराण

 रविंद्र कुवेसकर -उतेखोल/माणगांव



माणगांवात अनेक ठिकाणी अजुनही कचरा डंपिंग केला जातो. हा इतरस्त्र पसरलेला प्लास्टीक मिश्रीत कचरा जाळला जात असल्यामुळे मोठ्या प्रमाणात धूर तयार होतो. उत्तरेकडून वाहणारे वारे हा धूर उतेखोलगांव कालवा परिसरातील साईनगर क्रांती नगर विकास काॅलनी वाकडाई नगर च्या दिशेने घेऊन येतात. थंडीमुळे धुकं पडायला सुरुवात झाली असे वाटते. त्या धुक्यात हा धूर मिसळतो आणि धुरकं तयार होतं. यामुळे हवेत प्रदूषणाची भर पडते गेले दोन तीन दिवसापासून सायंकाळच्या सुमारास हा प्रकार रात्री उशिरा पर्यंत येथिल नागरिकांना जाणवत असल्याची तक्रार अनेकांनी केली आहे. 

                या धुराच्या उग्रवासाने घसा खवखवतो, नाकं चुर-चुरते, डोळे झोंबतात. सध्या कोरोना संसर्गाचे प्रमाण जरी कमी झाले असले तरी हा धुर श्वासातून फुफ्फुसात गेल्यास त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नक्की हा धुर कोठून येत असावा याचा शोध घेत चर्चा सुरु आहे. आश्रमशाळे जवळील कचरा डंपिंग मैदानातील कचरा पेटविल्या मुळे हा धुर हवेत मिसळतो व उतेखोल येथिल परिसरात पसरुन नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याचे काही जणांचे म्हणण ऐकावयास मिळत आहे. 



       या आधीच संपूर्ण जगातच प्रदुषणामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडले आहे. पृथ्वीवर कार्बन डायऑक्साईडचा उच्चांक नोंदवला गेला आहे. ग्लोबल वाॅर्मिंगमुळे नैसर्गिक आपत्ती वाढल्या आहेत. त्यामुळे वर वर दिसणारी, दुर्लक्षित होणारी हीच छोटी छोटी कारणे माणसाचे आरोग्याला घातक ठरुन उद्धवस्त करु पाहताहेत. त्यामुळे या प्रदुषणकारी कचरा जाळण्याच्या प्रकाराला आळा घालणेसाठी आपल्या सर्वांनाच जागरुक राहावे लागणार याकडे माणगांवकरांनी तसेच नगरपंचायत प्रशासनानेही लक्ष वेधावे अशी चर्चा ऐकावयास मिळत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies